भारतीय सैन्याला (Indian Army) योग्य उत्तर देण्याचे देशाला दिलेले वचन आम्ही पूर्ण केले आहे. कुराणात म्हटले आहे की, लहान सैन्य अनेकदा मोठ्या सैन्यावर मात करते. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. कोणत्याही आक्रमणाविरुद्ध आपले सैन्य आणि पाकिस्तानचे लोक पोलादी भिंतीसारखे एकजूट आहेत. भारताकडे कितीही शस्त्रे असली किंवा कितीही मोठी सेना असल्याचा दावा केला, तरी तो आपल्याला घाबरवू शकत नाही, असे फूत्कार पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर (Asim Munir) यांनी काढले आहेत. (India-Pakistan War)
(हेही वाचा – SSC Result 2025 : दहावीचा निकाल जाहीर, यंदा 94.10% विद्यार्थी उत्तीर्ण; कोकणाने पुन्हा मारली बाजी)
या वेळी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी कुराणाचेही दाखले दिले आहेत. मुनीर यांनी म्हटले आहे की, कुराणात म्हटले आहे की लहान सैन्य अनेकदा मोठ्या सैन्यावर मात करते. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. कोणत्याही आक्रमणाविरुद्ध आपले सैन्य आणि पाकिस्तानचे लोक पोलादी भिंतीसारखे एकजूट आहेत.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर प्रत्युत्तर दिले आहे. आतंकवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त केले आहेत. असे असूनही पाकिस्तानी नेते भारताविरोधात विखारी वक्तव्ये करत आहेत. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते अहमद शरीफ चौधरी म्हणाले की, पाकिस्तान हा असा देश आहे ज्याला शक्ती किंवा कपटाने घाबरवता येणार नाही. भारताने पाकिस्तानची प्रत्युत्तराची कारवाई स्वीकारण्याची वेळ आली आहे. आमच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे भारताला गुडघे टेकण्यास भाग पाडले गेले. आमच्या विजयाने हे सिद्ध केले की, जगातील कोणतीही शक्ती पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला धोका देऊ शकत नाही. (India-Pakistan War)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community