IPL 2025 : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेली आयपीएल पुन्हा एकदा सुरु होणार आहे. येत्या १७ मेपासून IPL 2025 च्या उर्वरित सामने खेळविण्यात येणार असून ०३ जूनला अंतिम सामना खेळविला जाणार आहे.
(हेही वाचा DGMO Meeting : भारत-पाकिस्तान डीजीएमओ बैठकीत काय झालं; पाकिस्तानी डीजीएमओची ग्वाही, म्हणाले… )
दरम्यान, उर्वरित १७ सामने सहा मैदानांवर खेळविण्यात येतील, असे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भारत-पाकिस्तान तणावानंतर आयपीएलचे काय होणार असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला होता. त्यानंतर आता बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट केली असून लवकरच उर्वरित सामने खेळविले जाणार आहेत.
विशेष म्हणजे बीसीसीआयने आयपीएल २०२५च्या उर्वरित १७ सामन्यांचे वेळापत्रक जारी केले आहे. दि. ०३ जूनला अंतिम सामना तर दि. २९ मेला पहिला क्वालियफायर, दि. ०१ जूनला दुसरा क्वालिफायर सामना खेळविला जाईल, असे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे.IPL 2025
Join Our WhatsApp Community