Operation Sindoor : किराना हिल्सवरील पाकिस्तानी ‘न्युक्लिअर स्टोरेज फॅसिलिटी’ला लक्ष्य केलं का?, एअर मार्शल भारती म्हणाले…

भारताने Operation Sindoor अंतर्गत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. तिन्ही सैन्यदलांच्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली असून भारताच्या हवाई हल्ल्यात दहशतवादी तळं नेस्तानाबूत करण्यात आली आहेत.

72

Operation Sindoor :   भारताने Operation Sindoor अंतर्गत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. तिन्ही सैन्यदलांच्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली असून भारताच्या हवाई हल्ल्यात दहशतवादी तळं नेस्तानाबूत करण्यात आली आहेत.

(हेही वाचा Operation Sindoor : देशातील ३२ विमानतळावरून नागरी उड्डाण पुन्हा सुरू, प्राधिकरणाकडून निवेदन जारी )

सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने पाकिस्तानमधील किराना हिल्सवरील ‘न्युक्लिअर स्टोरेज फॅसिलिटी’ला भारताकडून लक्ष्य करण्यात आले का?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना एअर मार्शल एके भारती म्हणाले, किराना हिल्सवर काही आण्विक यंत्रणा आहे हे सांगितल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला याबाबत माहिती नव्हती. आम्ही त्याठिकाणी हल्ला केला नाही.

दरम्यान, पाकिस्तानच्या किराना हिल्सवरील ‘न्युक्लिअर स्टोरेज फॅसिलिटी’ला लक्ष्य करण्यात आल्याच्या बातम्या माध्यमातून प्रसारित होत होत्या. त्यावर आता भारतीय सैन्यदलाकडून भाष्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर, सरगोदा एअरबेसवर भारतीय सैन्यदलाने जोरदार हल्ला केल्याने हवाईतळ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले.Operation Sindoor

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.