Viral Video : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवादाविरोधात कठोर कारवाईचा पवित्रा घेतला. त्यानुसार, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात मोठी कारवाई केली. भारताने केलेल्या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले. तर ०९ दहशतवादी तळं देखील भारतीय सेनेकडून उद्ध्वस्त करण्यात आली.
दरम्यान, भारताने केलेल्या कठोर कारवाईनंतर पाकिस्तानची चांगलीच गोची झाली असून स्थानिक पाकिस्तानी नागरिकांकडून विचित्र प्रतिक्रिया समोर येत आहे. भारताने कारवाईबाबतचे पुरावे दिल्यानंतरही पाकिस्तानकडून खोटे दावे करण्यात येत आहेत. आता या दाव्याला पाकिस्तान सरकारसह स्थानिकांकडूनही अर्थहीन वक्तव्य केली जात आहेत.
(हेही वाचा Operation Sindoor : ‘रामचरितमानस’चा संदर्भ, समझदारों को इशारा…; सैन्यदलांची झंझावाती पत्रकार परिषद )
एका व्हायरल व्हिडीओत पाकिस्तानी सैन्याने दिलेल्या कबूलीनंतर हे सर्व पाहून काही पाकिस्तानी नागरिक स्तब्ध झाले. त्यांच्याकडून बेताल वक्तव्ये केली जात असून सरासरी पाकिस्तानी लोकांना वाटते की काळ्या जादूमुळे भारत जिंकला. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेला तणाव संपला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने मंगळवार-बुधवारच्या मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पाकिस्तानला त्याच्या नापाक कृत्याचा धडा शिकवला. या कारवाईमुळे पाकिस्तानलाही खूप नुकसान झाले. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने ७ आणि ८ तारखेच्या रात्री भारतातील १५ शहरांवर हल्ला करण्याचा जोरदार प्रयत्न केला, परंतु तो हाणून पाडण्यात आला. प्रत्युत्तरादाखल भारताने ड्रोनद्वारे पाकिस्तानच्या अनेक शहरांवर हल्ला केला आणि लाहोरमधील त्यांची हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त केली.
. . . आणखी किती स्वतःचाच अपमान कराल पाकिस्तान्यांनो
गेल्या २० दिवसांत पाकिस्तानने भारताची ताकद पाहिली आहे. पण तरीही काही पाकिस्तानी लोकांनी भारतावर खोटे आरोप केले आहेत, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक पाकिस्तानी तरुण म्हणत आहे की भारताने हे युद्ध काळ्या जादूने जिंकले आहे, भारतानेही त्याच्या सामन्यात असेच केले. पुढे तो तरुण म्हणतो की त्यांचे जादूगार येतात आणि ते जिंकतात. एक मुलगा विचारतो की तुम्ही लोकांनी काळ्या जादूने काम केले नाही का, तर तो म्हणतो की इस्लाममुळे आम्हाला काळ्या जादूची माहिती नाही, असे तो म्हणाला.
खोटे बोलण्यात पाकिस्तान आघाडीवर
भारताच्या कारवाईने संपूर्ण पाकिस्तान हादरला आहे. भारताने आपल्या हवाई हल्ल्यात पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त केले. पण नंतर नापाक पाकिस्तानने आपल्या कारवाया थांबवल्या नाहीत, त्यांनी सोशल मीडियावर खोट्या अफवा पसरवल्या, त्यांच्या लष्करप्रमुखांपासून पंतप्रधानांपर्यंत सर्वांनी पाकिस्तानी लोकांना चुकीची माहिती दिली.
Join Our WhatsApp Community