Operation Sindoor : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमावर देशभरातील ३१ विमानतळे सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर आता भारत-पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधी करारानंतर दोन्ही देशांत शांतता प्रस्थापित करण्याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत. भारत सरकारने घातलेली विमानतळ बंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. १५ मे २०२५ रोजी सकाळी ०५:२९ वाजेपर्यंत देशातील ३२ विमानतळे नागरी विमानांच्या उड्डाणांसाठी तात्पुरती बंद ठेवण्याची सूचना जारी करण्यात आली. ही विमानतळे आता तात्काळ प्रभावाने नागरी विमानांच्या उड्डाणांसाठी उपलब्ध आहेत असे कळविण्यात येत आहे. प्रवाशांनी थेट एअरलाइन्सकडून विमानाची स्थिती तपासावी आणि नियमित अपडेटसाठी एअरलाइनच्या वेबसाइटचे निरीक्षण करावे, असे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
(हेही वाचा Operation Sindoor : ‘रामचरितमानस’चा संदर्भ, समझदारों को इशारा…; सैन्यदलांची झंझावाती पत्रकार परिषद )
दरम्यान, देशभरातील ३१ विमानतळे नागरी उड्डाणाकरिता खुली करण्यात आली आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या परिपत्रकात यासंदर्भात माहिती देण्यात आली. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर श्रीनगर आणि अमृतसर यासारख्या प्रमुख विमानतळांसह अन्य विमानतळांवर १५ मे पर्यंत नागरी उड्डाणास स्थगिती देण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community