Trade War : व्यापारी युद्धाची भीतीही सरली? अमेरिकेचा चीनला दिलासा देण्याचे संकेत

Trade War : चीनवरील आयात शुल्क ८० टक्क्यांपर्यंत कमी करण्याची शक्यता.

45
Trade War : व्यापारी युद्धाची भीतीही सरली? अमेरिकेचा चीनला दिलासा देण्याचे संकेत
  • ऋजुता लुकतुके

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर लादलेलं आयात शुल्क ८० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यातील नवीन व्यापारी करार अंतिम टप्प्यात असून या आठवड्यात त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. एप्रिलच्या सुरुवातीला अमेरिकेनं चीनवर १२० टक्के शुल्कवाढ लादल्यानंतर चीननेही अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची तयारी चालवली होती. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापारी तणाव निर्माण झाला होता. पण, त्यानंतर चीनने अमेरिकेबरोबर वाटाघाटी करण्याची तयारी दाखवली. आता नवीन व्यापारी करारासाठी बोलणी अंतिम टप्प्यात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल अकाऊंटवरुन चीनवर ८० टक्के शुल्क योग्य असल्याचं म्हटलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रेजरी सचिव स्कॉट बी यांचा उल्लेख केला. जिनेव्हा मध्ये होणाऱ्या एका बैठकीत चीनसोबत ते चर्चा करणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एक आहे. दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेलं व्यापार युद्ध कमी करण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल आहे. (Trade War)

(हेही वाचा – भारतीय नागरिकांनाच देशात राहण्याचा अधिकार Rohingya यांना नाही; Supreme Court चा आदेश)

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की चीननं त्यांचा बाजार अमेरिकेसाठी खुला करावा, हे त्यांच्यासाठी चांगलं असेल. बंद बाजारासोबत आता काम होत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्क ८० टक्के शुल्क हे सध्याच्या १४५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. गुरुवारी अमेरिका आणि यूके यांच्या दरम्यान व्यापारी करार झाला आहे. चीन अमेरिका हे मोठे व्यापारी भागिदार आहेत. अमेरिकेच्या व्यापार कार्यालयानुसार २०२४ मध्ये अमेरिकेने चीनला १४३.५ अब्ज डॉलर किमतीची निर्यात केली. तर, ४३८.९ अब्ज डॉलरची आयात केली. (Trade War)

(हेही वाचा – Virat Kohli : इंग्लंडच्या काऊंटीकडून विराटला निवृत्तीवरून डिवचणारा व्हिडिओ)

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिलला व्यापारी भागीदार देशांसाठी परस्पर शुल्क लावण्याची घोषणा केली होती. यानंतर चीननं देखील प्रत्युत्तर दिलं होतं. दोन्ही देशांनी एकमेकांवर जोरदार आयात शुल्क वाढवलं. अमेरिकेने १२५ टक्के आयात शुल्क लादण्याची घोषणा केल्यावर चीननेही अमेरिकेवर १४५ टक्के शुल्क लादण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंना शुल्क वाढीतून वगळलं होतं. (Trade War)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.