IPL 2025, Jose Hazelwood : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठा धक्का; जोस हेझलवूड उर्वरित सामन्यांना मुकणार

IPL 2025, Jose Hazelwood : रजत पाटिदारलाही बोटाची दुखापत सतावतेय.

47
IPL 2025, Jose Hazelwood : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठा धक्का; जोस हेझलवूड उर्वरित सामन्यांना मुकणार
  • ऋजुता लुकतुके

आयपीएल २०२५ च्या उर्वरित सामन्यांचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. पण, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला एक धक्का बसला आहे. या हंगामात पर्पल कॅपच्या स्पर्धेत असलेला जोस हेझलवूड उर्वरित आयपीएलमधून बाहेर झाला आहे. हेझलवूड खांद्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. तर कर्णधार रजत पाटिदारचंही बोट दुखावलं आहे. या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत हेझलवूड तिसऱ्या स्थानावर आहे. हेझलवूडने १८ बळी मिळवले आहेत. (IPL 2025, Jose Hazelwood)

(हेही वाचा – SSC Result : ‘या’ दिवशी दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता)

भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे आयपीएल २०२५ एका आठवड्याची विश्रांती घेण्यात आली आहे. पण, उर्वरित सामन्यांचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल असे बीसीसीआयचे म्हणणे आहे. स्पर्धा १६ मे पासून पुन्हा सुरू होऊ शकते, तर अंतिम सामना ३० मे रोजी होण्याची अपेक्षा आहे. नवीन वेळापत्रकापूर्वीही फॉर्ममध्ये असलेल्या आरसीबीला मोठा धक्का बसला आहे. या हंगामात संघासाठी सर्वाधिक बळी घेणाऱ्या वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला उर्वरित सामन्यांमध्ये खेळणे खूप कठीण वाटते. (IPL 2025, Jose Hazelwood)

(हेही वाचा – Rain Alert : येत्या २ दिवसांत बहुतेक राज्यांत पावसाची शक्यता)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हेझलवुड सध्या खांद्याच्या दुखापतीने त्रस्त आहे आणि तो स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतात येऊ शकत नाही. ऑस्ट्रेलियाकडून त्याला ११ जूनपासून लॉर्ड्सवर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामनाही खेळायचा आहे. त्यामुळे, स्पर्धा पुन्हा सुरू झाल्यावर त्याच्या येण्याची शक्यता जवळजवळ शून्य आहे. (IPL 2025, Jose Hazelwood)

आयपीएल २०२५ मध्ये बंगळुरू फ्रँचाईजीने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. या हंगामात संघाने आतापर्यंत एकूण ११ सामने खेळले आहेत, त्यापैकी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ८ सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, संघाला ३ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. आरसीबीचे एकूण १६ गुण आहेत. बाद फेरीतील जागा निश्चित करण्यासाठी आरसीबीला फक्त एका विजयाची आवश्यकता आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघाच्या फलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली आहे, फलंदाज आणि गोलंदाज चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. (IPL 2025, Jose Hazelwood)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.