महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (SSC Board) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. निकालाची अधिकृत घोषणा मंडळाच्या संकेतस्थळावर केली जाईल. निकालानंतर विद्यार्थी आपला क्रमांक आणि इतर तपशील टाकून निकाल पाहू शकतील. (SSC Result)
राज्यात यंदा मार्च २०२५ (March 2025) मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत सुमारे १६ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. यंदा परीक्षा शांततेत आणि सुरळीत पार पडली होती. त्यामुळे निकालाबाबत विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
(हेही वाचा – काश्मीरमधून Pakistan साठी हेरगिरी करणाऱ्यांवर छापे; महत्त्वाचे पुरावे हाती)
विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळासह इतर संकेतस्थळांवरही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निकाल पाहण्यासाठी www.mahresult.nic.in, www.sscresult.mkcl.org या संकेतस्थळांचा उपयोग करता येणार आहे. विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी आपला सीट नंबर व इतर तपशील आवश्यक असेल.
दरम्यान, निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनासाठीही ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रमाणपत्रही लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.
मंडळाने विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अफवा आणि चुकीच्या माहितीपासून दूर राहण्याचे आवाहन केले. (SSC Result)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community