IPL 2025 : भारत – पाक तणाव निवळल्यावर आयपीएल पुन्हा सुरू होण्याची शक्यता, ३० मे ला अंतिम सामना?

79

ऋजुता लुकतुके

भारत आणि पाकिस्तानची सेना युद्धबंदीला (Ceasefire) तयार झाल्यानंतर सीमेवरील तणाव निवळला आहे. आणि त्यामुळे आयपीएल पुन्हा सुरू करण्यावरही बीसीसीआयने विचार सुरू केला आहे. शनिवारी संध्याकाळी बीसीसीआय आणि आयपीएलच्या (IPL 2025) पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली. आणि त्यानंतर सर्व फ्रँचाईजींना पुढील योजनेचे अपडेट देण्यात आले आहेत. नवीन योजनेनुसार, पुढील आठवड्यात शुक्रवार किंवा शनिवारला उर्वरित आयपीएल सुरू करण्याचा बीसीसीआयचा इरादा आहे. आणि अंतिम फेरी ३० मे किंवा १ जूनला होण्याची शक्यता आहे. उर्वरित दिवसांत दर दिवशी दोन सामने असं करून १४ साखळी सामने संपवण्यात येणार आहेत. हे सामने बहुतेक करून बंगळुरू, चेन्नई आणि हैद्राबाद इथं होतील अशी शक्यता आहे.

(हेही वाचा – Devendra Fadanvis – Sharad Pawar समोरासमोर; सहकारावरून राजकीय जुगलबंदीला चढणार रंग)

बाद फेरीचे सामने ठरल्याप्रमाणे हैद्राबाद (Hyderabad) आणि कोलकाता (Kolkata) इथंच भरवण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. पण, कोलकात्यात पावसाची शक्यता असेल, तर हा सामना अहमदाबादला हलवण्याची तयारी आयपीएल प्रशासनाने ठेवली आहे. ८ मे रोजी धरमशाला इथं पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना अर्धवट थांबवण्यात आला होता. त्याच सामन्यापासून आयपीएलला सुरुवात होईल.

२२ एप्रिलला पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या ९ दहशतवादी तळांवर हल्ले केले. आणि त्यानंतर सीमेवरील परिस्थिती गेले ३ दिवस चघळली होती. पण, १० मे ला संध्याकाळी दोन्ही देशांनी युद्धबंदीचा निर्णय जाहीर केला आहे. ८ तारखेला आयपीएल स्थगित झाल्यानंतर लीगमधील अनेक परदेशी खेळाडू मायदेशी परतले आहेत. आणि त्यांना मंगळवारपर्यंत भारतात परतण्याची विनंती बीसीसीआयने केली आहे. सध्या फ्रँचाईजींना तसं सांगण्यात आलं आहे. पुढील आयपीएल वेळापत्रकाचे दोन संभाव्य पर्याय बीसीसीआयने तयार केले आहेत. आणि फ्रंचाईजींचं मत विचारातून घेऊन तसंच प्रवासाचे आराखडे यांचा अंदाज घेऊन अंतिम कार्यक्रम ठरवण्यात येईल. (IPL 2025)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.