भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या जोरदार संघर्षानंतर १० मे रोजी शस्त्रविराम झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी त्यासाठी मध्यस्थी केली. त्यामुळे भारत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर असतांना शस्त्रविराम करण्यात आला. (India Pakistan War)
(हेही वाचा – Ceasefire Violation : पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्या गमावल्या)
असे असले, तरी शस्त्रसंधी केल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार करण्यात आला. त्यामुळे पाकिस्तानने आगळीक केल्यास जशास तसे उत्तर मिळेल असेही सांगितले. या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स (J.D. Vance) यांना बजावले आहे. ‘आता पाकिस्तानला माफी मिळणार नाही. आता मिळणारे उत्तर अधिक कठोर आणि जोरदार असेल’, असे मोदींनी व्हान्स यांना सांगितले आहे. व्हान्स यांना तीन दिवस चाललेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये ३५ ते ४० पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचीही माहिती देण्यात आली.
१२ मे या दिवशी पाकिस्तान आणि भारत यांच्या डीजीएमओची बैठकही होणार आहे. यात कुठल्या अटी आणि शर्थी पाकिस्तानपुढे ठेवल्या जातात हे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
तत्पूर्वी, डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यंतरी सांगितले की, ते काश्मीरवर तोडगा काढण्यासाठी भारत आणि पाकिस्तानसोबत काम करणार आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) तणाव निवळल्यानंतर ते दोन्ही राष्ट्रांसोबत व्यापार वाढवतील, असे सांगितले.
“सध्याच्या आक्रमकतेला थांबवण्याची वेळ आली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या मजबूत आणि अटल शक्तिशाली नेतृत्वाचा मला खूप अभिमान आहे”, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. (India Pakistan War)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community