नागपूर (Nagpur) पोलिसांनी नवीन कामठी परिसरात ११ मेच्या रात्री पोलिसांनी एका ड्रग्ज पार्टीवर धाड टाकली. या वेळी पोलिसांनी चार महिलांसह आठ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एमडी ड्रग्ज, हुक्का आणि इतर अमली पदार्थांचे साहित्य, तसेच महागडे मोबाइल फोन आणि दोन आलिशान गाड्यांसह २६ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Drugs Seized) गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ५ च्या पथकाने ही कारवाई केली. शनिवारी मध्यरात्री एस. फार्महाऊस, आशा हॉस्पिटलजवळ ही ड्रग्ज पार्टी (Drug Party) चालू होती.
(हेही वाचा – CA Exam : द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सकडून नवे वेळापत्रक जाहीर!)
पोलिसांनी छापा (Police Raid) टाकून सुनील शंकरलाल अग्रवाल (वय ६१ वर्षे), गौतम सुशील जैन (वय ५१ वर्षे), नीलेश बाबुलाल गडीया (वय ६१ वर्षे), मितेश मनोहरलाल खकर (वय ४८ वर्षे) यांच्यासह चार महिलांना रंगेहाथ पकडले. तपासात आरोपी सुनील अग्रवाल यांच्याकडून १.३१ ग्रॅम एमडी ड्रग्ज (१५,७२० रुपये), एक हुक्का (२,००० रुपये) आणि प्रतिबंधित सुगंधी तंबाखू (५० रुपये) जप्त करण्यात आले.
या व्यतिरिक्त अटक केलेल्या इतर आरोपींच्या ताब्यातून विविध कंपन्यांचे सहा महागडे अँड्रॉइड मोबाइल (Android Mobile) फोन, दोन आलिशान चारचाकी गाड्या (अंदाजित किंमत २२ लाख रुपये) आणि ५८,००० रुपये रोख रक्कम असा एकूण २७ लाख ७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी नवीन कामठी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ड्रग्ज पार्टीमागे आणखी कोण सामील आहे आणि या ड्रग्जचा पुरवठा कुठून होत होता, याचा तपास करण्यात येत आहे. (Nagpur)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community