शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर तीन तासांतच पाकिस्ताने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सीमेवर गोळीबार केला. भारतीय सैन्याला अशा प्रकारे भीडणे पाकला महागात पडले आहे. (Ceasefire Violation) शनिवार, १० मेच्या रात्री सलग तीन तास पाकिस्तानने लडाख ते भूजपर्यंत ड्रोन हल्ल्यांनी भारतीय जनतेत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात एलओसीवर (LOC) पाकिस्तानला १६ सैनिक गमवावे लागले. भारतीय बाजूने केलेल्या कारवाईत पाकचे ८ बंकर आणि ६ सीमा चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. (India Pak War)
(हेही वाचा – Rain Update : नगर जिल्ह्याच्या काही भागात ‘या’ तारखेपर्यंत पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज)
पाकने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत एलओसी व आंतरराष्ट्रीय सीमेवर एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ले केले. याला भारताने जोरदार उत्तर दिले असून, यात पाकचे १६ जवान ठार झाले. तसेच ८ फॉरवर्ड बंकर व ६ सीमा चौक्या नष्ट केल्या. शस्त्रसंधी उल्लंघनानंतर तीन तासांत भारतालाही थोडी झळ सोसावी लागली आहे. याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही.
भारताने पाकिस्तानी तळांवर आणि हवाई संरक्षण रडार (Air defense Radar) यंत्रणांवर हल्ले करून तेथील यंत्रणा उद्ध्वस्त केली. रविवारी भारताच्या तिन्ही सैन्य दलांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत नकाशे आणि छायाचित्रांतून हल्ला केलेल्या ठिकाणांचे नुकसान प्रत्यक्ष दाखवले. हवाई दलाने हल्ला चढवलेल्या पाकिस्तानी हवाई तळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या हल्ल्यांसाठी भारतीय हवाई दलाने लढाऊ जेट विमाने (Fighter jets), मानवरहित ड्रोन, तसेच क्षेपणास्त्रांचा वापर केला. केवळ हवाई तळच नव्हे, तर पाकिस्तानची तांत्रिक पायाभूत यंत्रणा, नियंत्रण कक्ष, रडार साइट आणि शस्त्रागारावरही हल्ले करण्यात आल्याचे सांगण्यात आले. (Ceasefire Violation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community