कर्नाटकातील बंगळूर येथे ज्येष्ठ शास्त्रज्ञ Subbanna Ayyappan मागच्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. त्यानंतर अय्यप्पन यांचा मृतदेह दि. १० मे रोजी मांड्या जिल्ह्यातील श्रीरंगपटना येथे आढळून आला. कावेरी नदीच्या तीरावर मृतदेह आढळून आला असून, एका रहिवाश्याने त्वरीत स्थानिक पोलिसांना याबाबतची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांना अय्यप्पन यांच्या मृतदेहासह त्यांची दुचाकी नदीच्या किनाऱ्यावर आढळून आली.
(हेही वाचा Bob Cowper : आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिलं त्रिशतक ठोकणारे दिग्गज क्रिकेटर कालवश )
दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक अहवालात तरी असे निदर्शनास आले आहे की अय्यप्पन यांनी आत्महत्या केली आहे, परंतु नेमका त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांचा मृतदेहाचं पोस्टमार्टेम म्हैसुरुच्या के आर हॉस्पिटल येथे केला जाणार असून, त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी केली जाणार आहे. पद्मश्री सुब्बन्ना अय्यप्पन आपल्या पत्नीसह म्हैसुरु येथील विश्वेश्वरय्या नगर येथे राहत होते. ७ मे रोजी त्यांच्या कुटुंबियांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार विद्यारण्यपुरम पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली.
सुब्बन्ना अय्यप्पन यांचा जन्म १० डिसेंबर १९५५ रोजी दक्षिण कर्नाटकातील येलंदूर येथे झाला होता. मंगळुरुच्या विद्यापीठातून त्यांनी आपले पदवी तथा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. मत्स्यपालन शास्त्र तथा ब्लू रिव्होल्युशनमध्ये त्यांनी अत्यंत महत्वाचे योगदान दिले होते. मत्स्यपालन शास्त्रातील त्यांच्या कामासाठी भारत सरकारने त्यांना २०२२ साली पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात केले होते.
Join Our WhatsApp Community