Gokhale Flyover लोकांसाठी खुला; मुंबईच्या विकासाचा वेग चौपट वाढणार

63
Gokhale Flyover लोकांसाठी खुला; मुंबईच्या विकासाचा वेग चौपट वाढणार
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

अंधेरी पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा गोपाळ कृष्ण गोखले पूल नव्याने बांधून विक्रमी वेळेत पूर्णत्वास आला आहे. अभियांत्रिकीदृष्ट्या आव्हानात्मक स्थितीला सामोरे जात पूर्णत्वास आलेला हा प्रकल्प म्हणजे अभियांत्रिकीचा अद्वितीय नमुना ठरला आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी काढले. या पुलाच्या जोडणीमुळे मुंबईच्या विकासाचा वेग चौपट वाढणार असल्याचा विश्वासदेखील शेलार यांनी व्यक्त केला. (Gokhale Flyover)

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या, गोपाळकृष्ण गोखले लोहमार्ग उड्डाणपूल (रेल्वे ओव्हर ब्रीज) प्रकल्पाचे लोकार्पण महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या शुभहस्ते रविवारी ११ मे २०२५ रोजी सायंकाळी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. खासदार रवींद्र वायकर, आमदार अमित साटम, आमदार मुरजी पटेल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते यांच्यासह विविध मान्यवर, स्थानिक नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते. (Gokhale Flyover)

(हेही वाचा – मुंबईत यंदा ४१२ पंप बसवणार; पंपाची संख्या घटल्याचा BMC चा दावा )

या सोहळ्यात संबोधित करताना पालकमंत्री आशिष शेलार म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेचे अभियंते, कामगार आणि स्थापत्य तज्ज्ञ यांच्या अथक परिश्रमातून हा पूल अत्यंत आधुनिक पद्धतीने उभारण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी वापरण्यात आलेले प्री-फॅब्रिकेटेड तंत्रज्ञान, अ‍ॅन्टी-कोरोजन स्टील आणि कंपन शोषण करणारे विशेष जॉइंट्स ही या अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची महत्त्वाची वैशिष्ट्ये ठरली आहेत. संपूर्ण बांधकाम कालावधीत रेल्वे वाहतूक विनाव्यत्यय सुरु होती. या नवीन पुलामुळे रहदारीचा बोजा कमी होईल आणि नागरिकांना अधिक सुरक्षित, जलद व सुगम प्रवासाचा अनुभव मिळेल, असे देखील शेलार यांनी नमूद केले. (Gokhale Flyover)

खासदार रवींद्र वायकर भाषणात म्हणाले की, अंधेरी येथे उषा नाला आणि विल्सन टॉकीज यांना जोडणारा उड्डाणपूल नव्याने तयार करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वेक्षण करावे. मढ – मार्वे पुलाचे कामदेखील हाती घ्यावे, अशी सूचना वायकर यांनी केली. आमदार अमीत साटम म्हणाले की, महानगरपालिका आणि रेल्वे यांच्यातील समन्वयामुळे पूल २८ महिन्यांत पूर्ण झाला आहे. महानगरपालिका अभियंत्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. आमदार मुरजी पटेल म्हणाले की, महानगरपालिकेने उड्डाणपूल खुला करण्याच्या जाहीर केलेल्या तारखेपूर्वी म्हणजेच ३१ मे २०२५ पूर्वी खुला करून सर्वांना सुखद धक्का दिला आहे. (Gokhale Flyover)

(हेही वाचा – शस्त्रसंधीचे उल्लंघन आधी भारताने केले; पाकिस्तानचे पंतप्रधान Shahbaz Sharif यांचा धादांत खोटारडेपणा)

अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर म्हणाले की, सद्यस्थितीत, अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा महत्वाचा दुवा असलेला गोखले पूल पूर्णक्षमतेने कार्यान्वित करण्यात आला असून दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या पुलामुळे सांताक्रूझ ते गोरेगावच्या वाहतुकीत सुधारणा होणार आहे. नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे. पुलाचे काम ३० एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण होईल असे नियोजन करण्यात आले होते. मात्र, लोखंडी तुळई स्थापित करण्याचे काम काहीसे लांबले. तथापि, पुलाची इतर अनुषंगिक कामे समांतरपणे सुरु ठेवण्यात आली. अनेक व्यत्यय येऊनदेखील प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यश आले आहे. ३१ मे २०२५ रोजी या मुदतीची प्रतीक्षा न करता ३० एप्रिल २०२५ पर्यंत पुलाची कामे पूर्ण करण्यात आली. वाहतुकीस पूल खुला झाल्याने वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे, असे बांगर यांनी नमूद केले. (Gokhale Flyover)

अभिजीत बांगर पुढे म्हणाले की, महानगरपालिकेच्या पूल विभागाने पावसाळ्यापूर्वी ३ उड्डाणपूल खुले करण्याचे नियोजन केले आहे. त्यापैकी गोखले पुलाचे आज लोकार्पण होत आहे. ३१ मे २०२५ पर्यंत विक्रोळी पूल आणि १० जून २०२५ पर्यंत कर्नाक पूल वाहतुकीसाठी खुले करणे अपेक्षित आहे. एकंदरीतच पूल विभाग गुणवत्ता आणि गती यांवर लक्ष केंद्रित करून कामकाज करत आहे. त्यासोबतच विकास कामे सुरु असताना नागरिकांच्या सुविधेस यापुढे प्राधान्य दिले जाईल. कामे सुरु असताना नागरिकांना कमीत कमी असुविधा कशी होईल, अशा पद्धतीने नियोजन करून कामे पूर्ण केली जातील, असे बांगर यांनी नमूद केले. (Gokhale Flyover)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.