शस्त्रसंधीचे उल्लंघन आधी भारताने केले; पाकिस्तानचे पंतप्रधान Shahbaz Sharif यांचा धादांत खोटारडेपणा

भारताने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत प्रथम हल्ला सुरू केला, परंतु पाकिस्तानी सैन्याने काही तासांतच भारताला आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले, असे शरीफ म्हणाले.

73

भारत आणि पाकिस्तानमधील चार दिवसांच्या युद्धानंतर शनिवारी, १० मे रोजी सायंकाळी ५ वाजता युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. युद्धबंदी लागू झाल्यानंतर लागलीच ३ तासांनी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. जम्मू-काश्मीर, गुजरात, राजस्थान आणि पंजाबमध्ये ड्रोन हल्ले करण्यात आले. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी रात्री ११ वाजता पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. असे असताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांनी शनिवारी रात्री भारतीय वेळेनुसार ११:३० वाजता देशाला संबोधित करताना धडधडीत भारताविरुद्ध खोटे विधान केले. शाहबाज म्हणाले, भारताने शस्त्रसंधीचे उल्लंघन आधी केले.

काय म्हणाले शरीफ? 

भारताने प्रथम हल्ला सुरू केला, परंतु पाकिस्तानी सैन्याने काही तासांतच भारताला आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले. ‘भारताला त्याचे परिणाम भोगावे लागतील. अल्लाहच्या कृपेने आमचे सैन्य असे काही बरसले की भारत ओरडला. भारताने हल्ला करून केलेल्या चुकीची किंमत निश्चितच चुकवावी लागेल. पाकिस्तान आपल्या सीमा आणि सन्मानाचे रक्षण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढेल आणि हे युद्ध त्याच्या समाप्तीपर्यंत पोहोचवेल, असे शरीफ (Shahbaz Sharif) म्हणाले.

(हेही वाचा Operation Sindoor : भारताच्या कारवाईत काय-काय उद्ध्वस्त झालं, तिन्ही सैन्यदलांच्या पत्रकार परिषदेत दिले पुरावे)

भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबवल्याबद्दल शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले. पाकिस्तानी पंतप्रधानांनी भारताविरुद्ध पाठिंबा दिल्याबद्दल सौदी अरेबिया, तुर्की आणि चीनचे आभार मानले. शरीफ (Shahbaz Sharif) यांनी पाकिस्तानचे सेनाप्रमुख मुल्ला असीम मुनीर याचेही कौतुक केले. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या बहाण्याने पाकिस्तानवर हल्ला करण्यात आला. हा दहशतवादी हल्ला पाकिस्तानने केला नव्हता.  पाकिस्तान हा शांतताप्रिय देश आहे ज्याने हल्ल्याच्या चौकशीत सहकार्य करण्याची ऑफर दिली आहे, असेही शरीफ (Shahbaz Sharif) यांनी धादांत खोटे सांगितले. भारताने कायद्याचा मार्ग अवलंबला नाही, तर चिथावणीखोर कारवाई केली. पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. दहशतवादामुळे पाकिस्तानचे सर्वाधिक नुकसान झाले आहे, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पाकिस्तानने ९०,००० लोकांचे प्राण गमावले आहेत आणि १५२ अब्ज डॉलर्सचे आर्थिक नुकसान झाले आहे, असा कांगावाही शरीफ (Shahbaz Sharif) यांनी केला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.