CA Exam : भारत-पाकिस्तान तणावाचा परिणाम CA Exam वर झाल्याचे दिसून आले. या तणावाच्या पार्श्वभूमीवर, चार्टर्ड अकाऊंट्स परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया(आयसीएआय)ने चार्टर्ड अकाउंटंट्स फायनल, इंटरमीडिएट आणि इंटरनॅशनल टॅक्सेशन – असेसमेंट टेस्ट (आयएनटीटी-एटी) परीक्षा पुढे ढकलल्या. त्यानंतर आता नव्या सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
(हेही वाचा Operation Sindoor : भारतीय सैन्यदलांनी दिला रावलपिंडीपर्यंत तडाखा; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं वक्तव्य )
दरम्यान, द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया(आयसीएआय)ने चार्टर्ड अकाउंटंट्स फायनल, इंटरमीडिएट आणि इंटरनॅशनल टॅक्सेशन – असेसमेंट टेस्ट (आयएनटीटी-एटी) परीक्षा पुढे ढकलले असल्याची सूचना चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेच्या अधिकृत वेबसाइटवर जारी करण्यात आली. आता दि. ०९ मे ते १४ मे दरम्यान नियोजित असणाऱ्या परीक्षा आता सुधारित वेळापत्रकानुसार या परीक्षा १६ मे ते २४ मे दरम्यान घेतल्या जातील. CA Exam
तणावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याचा घेतला होता निर्णय
पाकिस्तानने आतापर्यंत भारतातील आध्यात्मिक स्थळांना लक्ष्य केले असून, सीमावर्ती भागातील शहरे व नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. पण भारताने त्यांना दर वेळी चोख प्रत्युत्तर दिले आहे. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हत्याकांडाला प्रत्युत्तर म्हणून ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सशस्त्र दलांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर हल्ला केला. गुरुवारी दिनांक ८ मे रोजी रात्री उशिरा, संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारताने जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील लष्करी तळांसह विविध प्रमुख ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न वेगाने हाणून पाडला.
Join Our WhatsApp Community