मुंबईत यंदा ४१२ पंप बसवणार; पंपाची संख्या घटल्याचा BMC चा दावा 

168
मुंबईत यंदा ४१२ पंप बसवणार; पंपाची संख्या घटल्याचा BMC चा दावा 
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई
संपूर्ण मुंबईत पाणी साचण्याची ३८६ ठिकाणे आढळून आली आहेत. याठिकाणच्या पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी गतवर्षी ४८२ उदंचन पंप व्यवस्था करण्यात आली होती. गेल्या वर्षभरात पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे विस्तारल्यामुळे तसेच सुधारणा कामांमुळे यंदा ४१७ उदंचन पंपांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे यंदा ६५ पंप कमी लावले जाणार आहेत. पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील नदी व मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू आहेत. (BMC) अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी पश्चिम उपनगरातील विविध ठिकाणांना शनिवारी १० मे २०२५ रोजी भेट दिली. त्यात वाकोला नदी (कनाकिया पूल), एस. एन. डी. टी नाला (गझधरबंद उदंचन केंद्र), ओशिवरा नदी (मालाड), पिरामल नाला (गोरेगाव पश्चिम), रामचंद्र नाला (मालाड पश्चिम) आदी ठिकाणांचा समावेश आहे. तसेच नदी व नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी करत संबंधितांना आवश्यक ते निर्देश दिले. प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) श्रीधर चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी दौऱ्याला उपस्थित होते. (BMC)
नाल्यातून गाळ काढण्याच्या कामाच्या पाहणीची सुरूवात पश्चिम उपनगरामध्ये वाकोला नदी (कनाकिया पूल) येथून झाली. वाकोला नदी प्रवाहाच्या खालील बाजूला  मिठी नदीला जाऊन मिळते. वाकोला नदीला ११ ठिकाणी पूरप्रतिबंधक दरवाजे  बसविण्यात आले आहेत. गतवर्षी पावसाळ्यात गोळीबार परिसरातील डिझेल जनरेटर पंप बंद पडला होता. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्याची समस्या उद्भवली होती. त्याची दखल घेताना (BMC) अभिजीत बांगर म्हणाले की, उदंचन पंप बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून डिझेल जनरेटर संच तातडीने उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे. त्या परिसरातील १२ उदंचन पंपांचा एक गट तयार करून पर्यायी व्यवस्था म्हणून वाहन आधारित एक डिझेल जनरेटर संच उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना त्यांनी केली. तसेच फिरते उदंचन पंपदेखील तयार ठेवावेत. तातडीच्या प्रसंगी या पर्यायी व्यवस्थेचा प्रतिसाद कालावधी कमी असला पाहिजे. जेणेकरून मोबाईल उदंचन पंप अथवा डिझेल जनरेटर संच तातडीने घटनास्थळी पोहचवता आले पाहिजेत, असे निर्देश अभिजीत बांगर यांनी दिले. जेथे आवश्यक त्याच ठिकाणी उदंचन पंप कार्यान्वित करावेत, विनाकारण खर्च नको, असेदेखील  बांगर यांनी नमूद केले. (BMC)
यंदा हे उदंचन पंप पावसाळ्यात बंद पडता कामा नये. उदंचन पंपांची यंत्रणा व पर्यायी यंत्रणा पूर्ण क्षमतेने  कार्यान्वित राहिली पाहिजे. अभियंत्यांनी अनुभवाच्या आधारावर पाणी साचण्याची ठिकाणे पूरमुक्त करावित, कामामध्ये नाविन्यता आणावी, (BMC) असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले. पर्जन्य जलवाहिन्या विभागातील अभियंत्यांनी पूरमुक्ती आणि पाणी साचण्याच्या ठिकाणी केलेल्या उपाययोजनांमध्ये दरवर्षी अनुभवाच्या आधारावर सुधारणा करावी. काही ठिकाणी पाणी साचण्याचे ठिकाण पूरमुक्त करण्याचे निश्चित करावे. कामामध्ये नाविन्यता आणावी. पावसाळा संपल्यानंतर तातडीने विविध कामांचा पाठपुरावा सुरू करावा, जेणेकरून पुढील पावसाळ्यापूर्वी कामे मार्गी लागतील, अशा विविध सूचनादेखील अभिजीत बांगर यांनी केल्या. गाळ उपसा व वहन प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होणार नाही, यासाठी अभियंत्यांनी दक्ष रहावे, त्रुटी आढळली तर कंत्राटदारांसमवेत अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले जाईल, असा इशारादेखील अभिजीत बांगर यांनी दिला. (BMC)
हेही पहा – 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.