भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावानंतर अखेर शनिवारी शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली. सध्या दोन्ही देशांच्या सीमेवर शांतता आहे. दरम्यान, या निर्णयाचे काँग्रेसमधील काही नेते टीका करत आहेत. इंदिरा गांधींची बरोबरी करत आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांच्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम (P Chidambaram) यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. पी चिदंबरम यांचा ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये प्रकाशित झालेला एक स्तंभ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
चिदंबरम म्हणाले की, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात सूड उगवण्याच्या तीव्र घोषणा होत होत्या, परंतु सरकारने मर्यादित लष्करी कारवाईचा मार्ग निवडून एक मोठे युद्ध टाळले. पी. चिदंबरम (P Chidambaram) म्हणाले की, ही लष्करी कारवाई मर्यादित आणि सुनियोजित होती, ज्याचा उद्देश दहशतवादी संघटनांच्या पायाभूत सुविधा नष्ट करणे होता. त्यांच्या लेखात त्यांनी पंतप्रधान मोदींचे हे पाऊल शहाणपणाचे असल्याचे म्हटले.
(हेही वाचा शस्त्रसंधीबाबत Shashi Tharoor यांनी काँग्रेसपेक्षा घेतली वेगळी भूमिका; म्हणाले, १९७१ ची परिस्थिती आणि…)
त्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आणि म्हटले की भारताने पूर्ण युद्धाची परिस्थिती टाळून जागतिक स्थिरतेला प्राधान्य दिले. चिदंबरम (P Chidambaram) यांनी २०२२ मध्ये पंतप्रधान मोदींनी व्लादिमीर पुतिन यांना बोललेल्या शब्दांचाही उल्लेख केला, ज्यात पंतप्रधान म्हणाले होते की ‘हा युद्धाचा काळ नाही’. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींचे हे शब्द जगाला अजूनही आठवतात आणि म्हणूनच अनेक देशांनी खाजगीरित्या भारताला युद्ध न करण्याचा सल्ला दिला. पी चिदंबरम (P Chidambaram) यांनी असेही स्पष्ट केले की, भारत आणि पाकिस्तान दोन्ही अणुशक्ती आहेत आणि पूर्ण युद्धामुळे केवळ प्रादेशिकच नाही तर जागतिक अस्थिरता निर्माण होऊ शकते. रशिया-युक्रेन आणि इस्रायल-गाझा संघर्षांचा उल्लेख करत ते म्हणाले की, जगाला आता युद्ध परवडणारे नाही.
Join Our WhatsApp Community