शस्त्रसंधीच्या आदल्या रात्री पाकिस्तानने (Pakistan) पुन्हा भारतावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला, भारतीय सैन्याने हा हल्ला परतवून लावला शिवाय पाकिस्तानला प्रत्युत्तरादाखल जो मारा केला त्यामध्ये पाकिस्तानचे कंबरडे मोडले. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने अखेर भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याची तयारी सुरु केली. त्यासाठी उच्च स्तरीय बैठकही बोलावली होती, मात्र ही माहिती भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेला दिल्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानची चांगलीच कानउघाडणी केली. पाकिस्तानच्या (Pakistan) या आततायीपणा या निमित्ताने भारताने अमेरिकेसमोर आणला आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील (Pakistan) लष्करी संघर्ष आणि ऑपरेशन सिंदूर नंतर अखेर शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली, परंतु त्यामागील कहाणी आता समोर आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्र हालचाली आणि ‘सिव्हिल फ्लाइट शील्ड’च्या वापराबद्दल अमेरिकेला माहिती दिली, तेव्हा भारताला राजनैतिक आघाडीवर मोठे यश मिळाले. यानंतर अमेरिकेला या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला.
भारतीय सुरक्षा यंत्रणांना अशी माहिती मिळाली होती की, पाकिस्तानी सैन्य भारतावर हल्ला करण्याची तयारी करत आहे आणि प्रवासी उड्डाणांमध्ये त्यांच्या लष्करी विमानांच्या हालचाली लपवून ते या कारवाया करत आहेत. हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी अमेरिकन प्रशासनाला सांगितले आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनीही पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन कसे करत आहे याबद्दल अमेरिकेला गंभीरपणे माहिती दिली.
(हेही वाचा India Pakistan War : भारत-पाक युद्धात पाकची पाठराखण करणाऱ्या चीनचा अजित डोवाल यांना फोन, म्हणाले….)
एनएसए अजित डोभाल आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी दिलेल्या ब्रीफिंगनंतर अमेरिकेला हे स्पष्ट झाले की, पाकिस्तानी (Pakistan) सैन्य भारतीय सैन्यावर हल्ला करण्यासाठी त्यांच्या नागरी विमानांचा वापर करत आहे. अमेरिकेनेही मान्य केले की पाकिस्तान हा जागतिक सुरक्षेसाठी धोका आहे.
पाकिस्तान (Pakistan) आपल्या सैन्याच्या पराभवानंतर एनएसए डोभाल यांच्याशीही बोलण्याचा प्रयत्न करत होता. यानंतर, वॉशिंग्टनने या मुद्द्यावर त्वरित कारवाई केली. अमेरिकेने दोन्ही देशांशी चर्चा केली आणि पाकिस्तानी सैन्याला माघार घेण्यास भाग पाडले. अमेरिकेच्या मध्यस्थीला न जुमानता भारताने स्वतःच्या अटींवर शस्त्रसंधीची घोषणा केली.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचा राजनैतिक आणि लष्करी विजय
चार दिवस चाललेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये, भारतीय सैन्याने पाकिस्तानला (Pakistan)योग्य उत्तर दिले आणि त्यांच्या लष्करी तळांवर अचूक हल्ले केले. संपूर्ण ऑपरेशन दरम्यान भारताचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. एनएसए अजित डोवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींना परिस्थितीची माहिती देत राहिले आणि त्यांना प्रत्येक टप्प्यावर अपडेट ठेवले जात होते. पंतप्रधानांनी असेही स्पष्ट केले होते की भारत आता जुने धोरण पाळणार नाही; प्रत्येक आक्रमणाला त्याच्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले जाईल.
Join Our WhatsApp Community