भारत पाकिस्तान यांच्यातील संघर्षात China ची डबल ढोलकी; भारताला सल्ला पण पाकिस्तानला पाठिंबा

चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर आणि बलुचिस्तानमधील चिनी गुंतवणूक. हेच कारण आहे की पहलगाम हल्ल्यानंतरही चीनने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला.

67

भारत – पाकिस्तान यांच्यात ८६ तास युद्ध चालल्यानंतर अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधी मान्य केली. तोवर चुपचाप बसलेला चीन (China) मात्र लागलीच व्यक्त झाला. तेव्हा चीनने थेट पाकिस्तानला पाठिंबा जाहीर केला आणि भारताला शांततेचा सल्ला दिला. दोन्ही देशांच्या संघर्षात चीनची डबल ढोलकी असणारी भूमिका समोर आली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना चीनच्या परराष्ट्र मंत्री वांग यांनी दूरध्वनी करून भारताने दहशतवादाच्या विरोधात केलेली कारवाई हे समर्थनीय आहे, पण शस्त्रसंधी स्वीकारणेही स्वागतार्ह आहे, असे म्हटले, मात्र त्याच वेळी पाकिस्तानला त्यांच्या ‘राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि प्रतिष्ठेचे रक्षण’ करण्यासाठी पाठिंबा देत असल्याचे जाहीर करून टाकले.

चीनचे (China) परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी दोन्ही देशांमधील कराराचे समर्थन केले आहे. वांग यी म्हणाले की, चीन दोन्ही देशांमध्ये रचनात्मक भूमिका बजावण्यास तयार आहे. एकीकडे चीन शांततेबद्दल बोलत असला तरी दुसरीकडे तो उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा देत आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांच्याशी फोनवर बोलताना सांगितले की, चीन (China) हा भारत आणि पाकिस्तान दोघांचाही शेजारी आहे. त्यामुळे, या प्रदेशातील वाढत्या तणावाबद्दल त्यांची चिंता स्वाभाविक आहे. पाकिस्तानमध्ये अलिकडच्या संघर्षात नागरिकांच्या मृत्युबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला आणि दोन्ही बाजूंनी शांतता निर्माण करण्यात सक्रियपणे सहभागी व्हावे यावर भर दिला. तसेच  बीजिंग ‘राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि प्रतिष्ठेचे रक्षण’ करण्यासाठी पाकिस्तानला पाठिंबा देत राहील, परंतु त्याच वेळी त्यांनी असेही म्हटले.

(हेही वाचा India Pakistan War : भारत-पाक युद्धात पाकची पाठराखण करणाऱ्या चीनचा अजित डोवाल यांना फोन, म्हणाले….)

चीन आणि पाकिस्तानमधील मैत्री

चीन (China) हा पाकिस्तानचा मित्र आहे. प्रत्येक वेळी पाकिस्तानला चीनचा पाठिंबा मिळाला आहे. यामध्ये चीनचे स्वतःचे हितसंबंध असू शकतात. उदाहरणार्थ, चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर आणि बलुचिस्तानमधील चिनी गुंतवणूक. हेच कारण आहे की पहलगाम हल्ल्यानंतरही चीनने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला. जेव्हा भारताने पाकिस्तानवर दबाव आणला तेव्हा चीन लगेच त्याच्या मदतीला धावून आला. चीनचे (China) परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला आणि त्याच्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे रक्षण करण्याबद्दल बोलले. यातून भारताला हे समजून घेण्याची गरज आहे की पाकिस्तान या युद्धात एकटा नसून त्यामागे चीन आहे.

चीनच्या बळावर पाकिस्तान ताकदवान 

चीननेच पाकिस्तानला ड्रोन, लढाऊ विमाने आणि HQ-9P सारख्या हवाई संरक्षण प्रणाली पुरवल्या आहेत. पाकिस्तानने भारताविरुद्ध वापरलेली बहुतेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन चिनी होते. पाकिस्तानच्या पाठीशी उभे असल्याचे चीनचे (China) विधान हे भारतासाठी एक संकेत आहे. याचा अर्थ असा की, चीन अजूनही भारताचा शत्रू आणि पाकिस्तानचा मित्र आहे. काहीही असो, शत्रूचा मित्र नेहमीच शत्रू राहतो. चीनचा पाकिस्तानला असलेला पाठिंबा केवळ राजनैतिक नाही. भविष्यात भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तर चीनही त्यात उडी घेईल, याचा हा संकेत आहे. अशा परिस्थितीत, भारताला आतापासून दोन आघाड्यांवर युद्धासाठी तयार राहावे लागेल.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.