Baluch Liberation Army : इकडे युध्दविराम तर तिकडे बलुच आर्मीचं पाकिस्तानबाबत खळबळजनक विधान

भारत-पाकिस्तान तणावात बलुच लिबरेशन आर्मी(Baluch Liberation Army)ने बलुचिस्तान प्रांत आपले हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे.

188

भारत-पाकिस्तान तणावात बलुच लिबरेशन आर्मी(Baluch Liberation Army)ने बलुचिस्तान प्रांत आपले हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानवर हल्ला केला असून मंगोचर शहर ताब्यात घेतले. तसेच, पाकिस्तानातील ३९ ठिकाणांवर बीएलएने हल्ला केला असून लवकरच स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा करण्याचा दावा करण्यात आला आहे. तर यापुढे जात संयुक्त राष्ट्रांनी बलुचिस्तानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी केली आहे.

(हेही वाचा भारत-पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधीचा निर्णय घेण्याआधी DGMO यांनी केली चर्चा; काय अधिकार आहेत ‘या’ पदाला ? )

दरम्यान, पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बलुच बंडखोरांनी पुन्हा एकदा कहर माजवला असून पाकिस्तानी सैन्य आणि सुरक्षा दल हादरले आहेत. बलुच लिबरेशन आर्मीने दावा केला की त्यांच्या ‘फतेह स्क्वॉड’ ने कलाट जिल्ह्यातील मंगोचर शहर ताब्यात घेतले आहे. या धाडसी कारवाईत, खजिनाई महामार्ग रोखण्यात आला व स्थानिक पोलिस कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. ज्यांना नंतर सोडून देण्यात आले.

बलुच प्रतिनिधी मीर यार बलोचने सांगितले, ‘पाकिस्तानचे पतन जवळ आले आहे’ आणि बलुचिस्तानचे स्वातंत्र्य लवकरच औपचारिकपणे घोषित केले जाऊ शकते. त्यांनी भारताने दिल्लीत बलुचिस्तानचा अधिकृत दूतावास उघडावा आणि संयुक्त राष्ट्रांनी बलुचिस्तानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी केली आहे. पाकिस्तानचा पतन जवळ आला आहे, असे खळबळजनक विधान बलुच लिबरेशन आर्मीने केले.

बलुच सैनिकांनी केले पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान

बलुचिस्तानमधील ३९ वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करण्यात आले. ज्यात पोलिस ठाणी, महामार्ग ब्लॉक, लष्करी काफिले आणि सरकारी खबऱ्यांना लक्ष्य करण्यात आले. बलुचिस्तानच्या नैसर्गिक संसाधनांचे कथित शोषण आणि पाकिस्तानी सैन्याकडून होणाऱ्या दडपशाहीला तोंड देण्यासाठी बीएलएच्या धोरणाचा हे ऑपरेशन्स भाग आहेत.

हे हल्ले तुर्बत, केच, क्वेट्टा आणि पंजगुर सारख्या प्रमुख शहरांमध्ये झाले. तुर्बतमधील डी बलोच भागात ग्रेनेड हल्ल्यांचे वृत्त आहे, तर केचमधील बुलेडा येथे जोरदार गोळीबार आणि स्फोटांनी परिसर हादरला. क्वेट्टामधील हजारगंजी आणि फैजाबाद येथील लष्करी चौक्यांवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.