Hydrogen Truck : अदानी समूहाची मिशन ग्रीन इंडियाकडे वाटचाल सुरू झाली असून देशातील पहिला हायड्रोजन ट्रक लाँच करण्यात आला आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी पहिल्या हायड्रोजन ट्रक हिरवा झेंडा दाखवला. दरम्यान, अदानी समूहाने एका भारतीय व आंतरराष्ट्रीय ऊर्जा कंपनीच्या सहकार्याने हायड्रोजन ट्रक विकसित केला आहे. खाणकाम आणि लॉजिस्टिक्समध्ये डिझेलला पर्याय म्हणून हायड्रोजनसारखे स्वच्छ इंधन वापरण्याचे अदानी समूहाचे उद्दिष्ट आहे. दि. १० मे रोजी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी रायपूरमध्ये पहिल्या ट्रकला हिरवा झेंडा दाखवला.
(हेही वाचा Sharad Pawar यांच्या वक्तव्याने देशात इंडी आघाडीत आणि राज्यात महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता )
मुख्यमंत्री साय यांनी हिरवा झेंडा दाखविलेल्या हायड्रोजन ट्रक्सचा गारे पेल्मा III ब्लॉकमधून राज्याच्या पॉवर प्लांटमध्ये कोळसा वाहून नेण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे. अदानी समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या अदानी एंटरप्रायझेसने स्वच्छ वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी भारतातील पहिल्या हायड्रोजन फ्युएल सेल ट्रकला हिरवा झेंडा दाखविला. कंपनी लॉजिस्टिक्स ऑपरेशनमध्ये वापरल्या जाणाऱ्या डिझेल वाहनांऐवजी हायड्रोजन ट्रकचा वापर करणार आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय ऊर्जा तंत्रज्ञान कंपनी आणि एका प्रमुख ऑटो उत्पादक कंपनीच्या सहकार्याने, अदानी कार्गो वाहतुकीसाठी हायड्रोजन फ्युएल सेल बॅटरीवर चालणारे ट्रक विकसित करत आहे.
अद्ययावत तंत्रज्ञान आणि तीन हायड्रोजन टँकने सुसज्ज असलेला प्रत्येक ट्रक २०० किलोमीटरच्या पल्ल्यात ४० टनांपर्यंत माल वाहून नेऊ शकतो. हायड्रोजन प्रकल्प अदानी नॅचरल रिसोर्सेस आणि अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड यांचा संयुक्त उपक्रम आहे. अदानी नॅचरल रिसोर्सेसने आशियामध्ये प्रथमच ‘डोझर पुश सेमी-ऑटोनॉमस तंत्रज्ञान’ स्वीकारले आहे. यामाध्यमातून सुरक्षितता आणि शाश्वतता वाढविण्यात येत असून भारताला हिरव्या भविष्याकडे नेण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे आहे.Hydrogen Truck
Join Our WhatsApp Community