पाकिस्तानने भारतीय महिला वैमानिकाला पकडल्याचा दावा खोटा; पीआयबीने Fact Check द्वारे केला पर्दाफाश 

पीआयबीने भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असल्यामुळे भारतीय सैनिक रडत आहेत आणि त्यांच्या पोस्ट सोडून जात आहेत या वृत्ताचे खंडन केले.

42

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यामातून कारवाई केली आहे. यानंतर पाकिस्तानही भारतीय हद्दीत हल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर खोटे दावे करणाऱ्या अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक (Fact Check) युनिटने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अनेक खोट्या बातम्या आणि चुकीच्या माहितीचे खंडन केले आहे. पीआयबी फॅक्ट चेकने  (Fact Check) भारतीय हवाई दलाच्या महिला पायलटला पाकिस्तानमध्ये पकडण्यात आल्याचा दावा फेटाळून लावला आहे.

पाकिस्तान समर्थक सोशल मीडिया अकाउंट्सनी दावा केला आहे की, भारतीय हवाई दलाच्या महिला पायलट, स्क्वॉड्रन लीडर शिवानी सिंग यांना, पाकिस्तानमध्ये पकडण्यात आले आहे. मात्र, पीआयबी फॅक्ट चेक  (Fact Check) युनिटने केलेल्या तपासणीत हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे पीआयबी फॅक्ट चेकने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

(हेही वाचा Isam : ‘चाँद-तारा’ याचा इस्लामशी काडीचा संबंध नाही; इस्लामी विचारवंताचा खुलासा; हा झेंडा पाकड्यांचाच)

दुसऱ्या एका फॅक्ट चेकमध्ये, पीआयबीने भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असल्यामुळे भारतीय सैनिक रडत आहेत आणि त्यांच्या पोस्ट सोडून जात आहेत या वृत्ताचे खंडन केले. पीआयबी फॅक्ट चेकने  (Fact Check) एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, एका जुन्या व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की, भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव तीव्र होत असताना भारतीय सैनिक रडत आहेत आणि त्यांच्या पोस्ट सोडून जात आहेत. मात्र, हा व्हिडिओ २७ एप्रिल रोजी इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला होता आणि तो भारतीय सैन्याशी संबंधित नाही! व्हिडिओमध्ये एका खाजगी संरक्षण प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी भारतीय सैन्यात त्यांची निवड झाल्याचा आनंद साजरा करताना दाखवण्यात आले आहे. व्हिडिओमधील तरुण त्यांच्या यशस्वी भरतीची बातमी मिळताच आनंदाने भावूक झाले आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.