Monsoon Update 2025 : अखेर मुंबईकरांची मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून मुंबईत धडकला आहे. राज्यातही काही भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. तसच मुंबईत ही अवकाली मान्सूनचं आगमन झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. दरम्यान नैऋत्य मान्सून देशात नियोजित वेळेपेक्षा ४ दिवस आधी पोहोचण्याची अपेक्षा आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) अंदाज वर्तवला आहे की तो २७ मे रोजी केरळच्या किनाऱ्यावर पोहोचेल. त्यानंतर ८ जुलैपर्यंत देशात सर्वत्र मान्सून व्यापेल. (Monsoon Update 2025)
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. की तो २७ मे रोजी केरळच्या किनाऱ्यावर पोहोचेल. भारतात साधारणपणे मान्सून १ जून रोजी येतो. पण हवामान खात्याच्या मते, ८ जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण देश व्यापेल. जर मान्सून २७ मे रोजी आला तर २००९ नंतर पहिल्यांदाच तो केरळमध्ये इतक्या लवकर पोहोचेल. २००९ मध्ये मान्सून २३ मे रोजी केरळमध्ये पोहोचला होता.
पुढील आठवड्यात अंदमान आणि निकोबारमध्ये मान्सूनचा पाऊस
पुढील आठवड्यापर्यंत अंदमान आणि निकोबारमध्ये मान्सूनचा पाऊस सुरू होऊ शकतो. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, १३ मे पर्यंत मान्सून अंदमान आणि निकोबारच्या (Andaman and Nicobar) काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे.
पाणीस्त्रोतांची पुनर्भरण प्रक्रिया, भूजल आणि धरणांची परिस्थिती सुधारण्यासाठीही ही लवकर येणारी पाऊसवृष्टी महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२४–२५ मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेतील शेती क्षेत्रावर सकारात्मक परिणाम अपेक्षित असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मान्सूनच्या लवकर आगमनामुळे शेतकऱ्यांना वेळेवर लागवड करण्याची संधी मिळेल, तर जलसंपदा विभागासाठी आणि पाणी व्यवस्थापन प्रकल्पांसाठीही नियोजन सुलभ होईल. त्यामुळे भारताच्या शेती-आधारित अर्थव्यवस्थेला पुन्हा वेग आणि जीवनदान मिळेल, अशी आशा IMD ने व्यक्त केली आहे.