India-Pakistan Tension : भारत-पाकिस्तान तणावात वाढ झाली असून सीमेवर भारतीय लष्काराकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. अशातच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत सद्यस्थितीवर भाष्य केले. सीमेवर पाकिस्तानकडून सातत्याने भारतीय नागरिकांवर हल्ला करण्यात येत आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपल्या सगळ्यांना माहित आहे की, पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे.
(हेही वाचा Local Body Election : राज्य निवडणूक आयोगासमोर काय आहेत आव्हाने ? )
पाकिस्तानने दहशतवादाचं नेहमी समर्थन केले आहे. परंतु, आता भारत थांबणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात योग्य उत्तर भारतीय सैन्य देत आहे. आणी आमच्या सेनेवर आम्हाला गर्व आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले, राज्यातील परिस्थितीसंदर्भात आम्ही कालच बैठक घेतली. वॉर ग्रुपप्रमाणे जी काही खबरदारी घ्यायची ती सगळी खबरदारी आपण घेतली आहे. सर्व जिल्हा युनिट्सना माहिती, संसाधनं देण्याबाबत योग्य समन्वय ठेवला आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केले.
भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर
दरम्यान, भारतीय सैन्यदलांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले जात असून भारताच्या कारवाईने पाकिस्तान पुरता घाबरगुंडीला आला. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी राजस्थान, गुजरात, पंजाब, जम्मू आणि काश्मीरमधील २६ शहरांवर ड्रोन हल्ले केले. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना सैन्याने केवळ ड्रोन पाडले नाहीत तर पाकिस्तानचे ड्रोन आणि दहशतवादी लाँच पॅड देखील नष्ट केले. यासंदर्भातला व्हिडीओ देखील जारी करण्यात आला.India-Pakistan Tension
Join Our WhatsApp Community