India-Pakistan Tension : भारत-पाकिस्तान तणाव यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसत असून सीमेवर दोन्ही बाजूने कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या लष्करी कारवाईत भारताने पाकिस्तानी लाँचपॅड उद्ध्वस्त केले. ज्या लाँचपॅडचा वापर करून पाकिस्तान भारतावर ड्रोन हल्ले करत होता तेच आता भारतीय लष्कराकडून उडवून देण्यात आले. त्याचबरोबर, भारताने पाकिस्तानातील किमान ०४ एअरबेसवर हल्ला करून मोठं नुकसान केले.
(हेही वाचा IMF Supports Pakistan : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकला मिळणार २.३ अब्ज अमेरिकन डॉलर; भारताचा जोरदार विरोध )
दरम्यान, भारतीय सैन्यदलांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले जात असून भारताच्या कारवाईने पाकिस्तान पुरता घाबरगुंडीला आला. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी राजस्थान, गुजरात, पंजाब, जम्मू आणि काश्मीरमधील २६ शहरांवर ड्रोन हल्ले केले. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना सैन्याने केवळ ड्रोन पाडले नाहीत तर पाकिस्तानचे ड्रोन आणि दहशतवादी लाँच पॅड देखील नष्ट केले. यासंदर्भातला व्हिडीओ देखील जारी करण्यात आला.
दरम्यान, दि. ०९ मे २०२५ रोजी जेव्हा पाकिस्तानने पुन्हा एकदा २६ भारतीय शहरांना लक्ष्य केले तेव्हा भारताने आपली कडक भूमिका दाखवली. पाकिस्तानमधील मुरीदके आणि शोरकोट येथील नूर खान एअरबेस आणि दहशतवादी लाँच पॅडवर लष्कराने हल्ला करून ते नष्ट केले. विशेष म्हणजे बिथरलेल्या पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बैठक घेतली. यानंतर, पाकिस्तानच्या नागरी उड्डयन प्राधिकरणाने १० मे २०२५ रोजी पहाटे ३:१५ ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत सर्व उड्डाणे बंद ठेवण्याची घोषणा केली.
पाकिस्तानने पेट्रोल पंप केले बंद
भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तान घाबरला आहे आणि हादरला आहे. यामुळे इस्लामाबादमधील सर्व पेट्रोल पंप पुढील ४८ तासांसाठी बंद ठेवण्यात आले. शनिवारी सकाळी ६ वाजता पाकिस्तानने हा आदेश जारी केला.India-Pakistan Tension
Join Our WhatsApp Community