India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत ; जम्मू – काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांची माहिती

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत ; जम्मू - काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांची माहिती

43
India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत ; जम्मू - काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांची माहिती
India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत ; जम्मू - काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांची माहिती

जम्मू आणि काश्मीरमध्ये (India Pakistan War) पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारामुळे अनेक निर्दोष नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या दु:खद घटनेवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून शोक व्यक्त करण्यात आला असून, मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. (India Pakistan War)

मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “निर्दोष नागरिकांचे प्राण गेल्याने आम्हाला अत्यंत दु:ख झाले आहे. माझे सरकार आपल्या जनतेची हानी कमी करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. कोणतीही भरपाई कधीच एखाद्या प्रिय व्यक्तीची जागा घेऊ शकत नाही किंवा कुटुंबावर झालेली मानसिक आघात भरून काढू शकत नाही. मात्र सहानुभूती आणि एकजुटीचा भाव म्हणून मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाईल.” असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. (India Pakistan War)

हेही वाचा-India Pakistan War : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर सेवा बंद ! सीमेवरील तणावादरम्यान चारधाम यात्रेत अलर्ट जारी

नियंत्रण रेषेजवळील पुंछ भागात काल रात्री जोरदार गोळीबार सुरू होता, ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि एक महिला जखमी झाली. नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या बाजूकडून झालेल्या गोळीबारात अनेक घरांचं नुकसान झालं आहे. नियंत्रण रेषेजवळील बारामुला, कुपवाडा आणि बांदीपोरा भागात परिस्थिती तणावपूर्ण आहे. कुपवाड्यातील काही सेक्टरमध्ये गोळीबारामुळे इमारतींचे नुकसान झाले आहे. (India Pakistan War)

हेही वाचा- Fact Check : अफवांचा बाजार उठवणाऱ्या पाकिस्तानचा भारतीय सैन्याकडून पुराव्यांसह पर्दाफाश !

या संपूर्ण परिस्थितीत भारतीय लष्कराने जम्मू-कश्मीरमध्ये रेड अलर्ट जाहीर केला असून नागरी प्रशासनाने ब्लॅकआउटची घोषणा केली. त्यामुळे संपूर्ण प्रदेशात रात्री वीज नव्हती. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. (India Pakistan War)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.