-
ऋजुता लुकतुके
यूपीआयचे व्यवहार आता अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून यूनिफाइड पेमेंटस इंटरफेस अर्थात, युपीआय सेवेत एक मूलभूत बदल केला आहे. व्यवहार पूर्ण झाला आहे की, नाही हे आता १५ सेकंदात समजू शकेल. यापूर्वी हा कालावधी ३० सेकंदांचा होता. यामुळे यूपीआयद्वारे पैसे पाठवणे आणि पैसे स्वीकारण्याची प्रक्रिया सर्व वर्गातील ग्राहकांसाठी वेगवान आणि फायदेशीर होण्याची अपेक्षा आहे. २६ एप्रिलला जारी करण्यात आलेल्या एनपीसीआयच्या पत्रकात सर्व बँका आणि पेमेंट अॅप्सना निर्देश देण्यात आले होते की, त्यांनी १६ जून २०२५ पासून नवीन प्रोसेसिंग नियम लागू करावेत. यूपीआयद्वारे दर महिन्याला २५ लाख कोटी रुपयांचे ऑनलाईन व्यवहार होतात. (UPI Payment)
(हेही वाचा – Operation Sindoor : कॉंग्रेसचे नेते पाकसाठी बनले हिरो; ‘तो’ व्हिडीओ झाला व्हायरल )
या बदलानंतर आता रिक्वेस्ट पे आणि रिस्पॉन्स पे सर्व्हिसचा प्रतिसादाचा वेळ ३० सेकंदांवरुन १५ सेकंदावर येईल. व्यवहार पूर्ण झाला आहे की नाही हे तपासणे आणि व्यवहार रिव्हर्सलसाठी १० सेकंद आणि पडताळणीसाठी १० सेकंद करण्यात आला आहे. या बदलाचा उद्देश यूपीआय पेमेंट प्रक्रियेत तेजी यावी हा आहे. भारतात डिजिटल पेमेंट सिस्टीमच्या रुपात यूपीआयची लोकप्रियता वाढलेली आहे. यूपीआयच्या आणि डिजीटल पेमेंटच्या वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी एनपीसीआयने बँका आणि अॅप्सना प्रतिसाद वेळेचं पालन करण्यासाठी सिस्टीम अपेडट करण्यास सांगितलं आहे. (UPI Payment)
(हेही वाचा – IPL Suspended : भारत – पाक तणावामुळे आयपीएल स्थगित झाल्यावर खेळाडू आपापल्या गावी पांगले)
गेल्या काही दिवसांमध्ये यूपीआय यंत्रणा ठप्प होण्याचे काही प्रकार घडले होते. १२ एप्रिलला यूपीआय ठप्प झालं होतं, तेव्हा अनेक व्यवहार अयशस्वी झाले होते. त्यावेळी यूजर्सना समस्यांना सामोरं जावं लागलंहोतं. त्यानंतर २६ मार्च, १ एप्रिल आणि १२ एप्रिल या तीन दिवशी यूपीआय सेवा वापरताना ग्राहकांना अडचणी आल्या होत्या. यूपीआय सेवा ठप्प होण्याचं कारण एनपीसीआयनं केलेल्या तपासणीत कळून आलं. व्यवहाराची पडताळणी करताना सेवेवर ताण पडत होता. त्यानंतर हा बदल करण्यात आला आहे. यूपीआय पेमेंटस पुरवणाऱ्यांमध्ये गुगल पे, फोन पे, पेटीएम, अमेझॉन पे, व्हॉट्सअॅप पेचा देखील समावेश आहे. याशिवाय भीम अॅपवरुन देखील सेवा पुरवली जाते. (UPI Payment)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community