Operation Sindoor : काँग्रेसचे नेते पाकसाठी बनले हिरो; ‘तो’ व्हिडीओ झाला व्हायरल 

190
Operation Sindoor : भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान घाबरला आहे. जम्मू-काश्मीर, अमृतसर आणि राजस्थानच्या सीमेवरील शहरांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा उद्देश आहे. गेल्या २४ तासांत पाकिस्तानने २६ ठिकाणी हल्ले केले आहेत. यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर देत पाडकड्यांचे हल्ले निष्क्रिय केले आहेत. तसेच पाकचा नियंत्रण रेषेवर  (LoC) अनेक ठिकाणी अधूनमधून गोळीबार सुरू आहे. (Operation Sindoor)
दरम्यान पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी (Pak Lt. General Ahmed Sharif Chowdhury) यांनी इस्लामाबादमध्ये पत्रकार परिषदेत २२ एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यानंतर काही भारतीय नागरिक आणि राजकारण्यांनी त्यांच्या सरकारला कसे कोंडीत पकडले होते याची आठवण करून दिली. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये पहलगाम हल्ल्यावर कसे वादग्रस्त विधाने करण्यात आली आहेत. हे व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट पणे दिसून येत आहे.  
पत्रकार परिषदमध्ये अहमद शरीफ चौधरी यांनी ६० देशांच्या राजदूतांसमोर आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर एक व्हिडिओ दाखवला. या व्हिडिओमध्ये पाच काँग्रेस (Congress) नेत्यांची विधाने दाखवण्यात आली होती, ज्यात स्वतः काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचाही समावेश होता. याशिवाय काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) तसेच आचार्य अभिमुक्तेश्वरानंद यांचे विधान, कथित शेतकरी नेते राकेश टिकैत यांचे विधान, ध्रुव राठी आणि नेहा सिंग राठोड यांचे विधान या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. 
(हेही वाचा – Uttan Beach : सुंदर बीच, केशव सृष्टी, डोंगरी किल्ला ट्रेकिंग आणि बरंच काही; उत्तन बीचला भेट द्या आणि करा मज्जाच मज्जा!)
पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर
तुर्की आणि इतर देशांच्या शस्त्रांवर अवलंबून असलेल्या पाकिस्तानने सलग दुसऱ्या दिवशी भारतातील २० हून अधिक शहरांना लक्ष्य केले, परंतु भारताने त्यांचे सर्व ड्रोन हल्ले पाडले. यामुळे परदेशी शस्त्रांच्या मदतीने लढण्याचा पाकिस्तानचा खुमखुमी भंग पावली आहे. दरम्यान भारतीय लष्कर पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानचे सर्व हल्ले निष्क्रिय करत आहेत. तसेच जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमधील लष्करी क्षेत्रांना लक्ष्य करणाऱ्या पाकिस्तानी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या दोन लाटा ४८ तासांत भारताच्या हवाई संरक्षण प्रणालींनी यशस्वीपणे उधळून लावल्या आहेत.

हेही पहा  –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.