- ऋजुता लुकतुके
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईला सुरुवात केली. ७ मे रोजी भारतीय लष्कराने याला चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानवर प्रतीहल्ला सुरू केला आहे. सुरुवातीला पाकिस्तानातील ९ दहशतवादी केंद्रांवर हल्ले केल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारताने थेट पाकिस्तानातील इस्लामाबाद, कराची या शहरांनाही लक्ष्य केलं आहे.
युद्धाला खर्च असतो. आणि पाकिस्तानला तो खर्च सध्या परवडणारा नाही. फक्त गस्तीसाठी त्यांना दररोज ४ अब्ज पाकिस्तानी रुपये खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट होत असल्याचे दिसत आहे.
गरिबीतून जात असलेला पाकिस्तान (Pakistan) आधीच आर्थिक संकटात आहे. दरम्यान, भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान आपल्या संरक्षण तरतुदीत १८ टक्क्यांपर्यंत वाढ करु शकतो. संरक्षण क्षेत्रात २.५ ट्रिलियन रुपयांपेक्षा जास्त खर्च होईल असा अंदाज आहे. पाकिस्तानसारख्या कमकुवत अर्थव्यवस्थेसाठी ही रक्कम मोठी गोष्ट आहे. दरम्यान, भारताने सिंधू पाणी करार (Indus waters treaty) रद्द करणे आणि व्यापारावर बंदी घालणे ही कृती पाकिस्तानची कोंडी करणारी ठरली आहे. त्याशिवाय, भारताने आज हवाई हल्लाही केला. अशा परिस्थितीत, आर्थिक संकटातून जात असलेल्या पाकिस्तानला फक्त सतर्क राहण्यासाठी दररोज सुमारे ४ अब्ज पाकिस्तानी रुपये खर्च करावे लागत आहेत. (Operation Sindoor)
(हेही वाचा – Virat Kohli to Retire : विराट कोहलीचा निवृत्तीचा विचार ; बीसीसीआयची पुनर्विचाराची मागणी)
पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) सरकारला सीमेवर सैन्य तैनात करण्यासाठी, विमानांसाठी इंधन देण्यासाठी आणि सीमेवर वस्तू पाठवण्यासाठी सुमारे ४ अब्ज पाकिस्तानी रुपये खर्च करावे लागत आहेत. पहलगाम दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला असल्याने, केवळ हाय अलर्टवर पाकिस्तानचा अंदाजे खर्च ११,२५३ कोटी पाकिस्तानी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. (Operation Sindoor)
भारताच्या संरक्षण खर्च पाकिस्तानपेक्षा खूपच जास्त आहे. गेल्या वर्षी भारताने पाकिस्तानपेक्षा संरक्षण क्षेत्रात जवळजवळ नऊ पट जास्त खर्च केला. २०२४ मध्ये भारताने संरक्षणावर ८६.१ अब्ज अमेरिकन डॉलर खर्च केले आहेत. तर पाकिस्तानचा संरक्षण खर्च फक्त १०.२ अब्ज डॉलर होता. स्वीडिश थिंक टँक स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीनुसार, भारत आपल्या सैन्याला बळकट करण्यासाठी संरक्षणावर उदारपणे खर्च करण्याच्या बाबतीत जगात पाचव्या क्रमांकावर आहे. (Operation Sindoor)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community