Fact Check : अफवांचा बाजार उठवणाऱ्या पाकिस्तानचा भारतीय सैन्याकडून पुराव्यांसह पर्दाफाश !

Fact Check : अफवांचा बाजार उठवणाऱ्या पाकिस्तानचा भारतीय सैन्याकडून पुराव्यांसह पर्दाफाश !

70
Fact Check : अफवांचा बाजार उठवणाऱ्या पाकिस्तानचा भारतीय सैन्याकडून पुराव्यांसह पर्दाफाश !
Fact Check : अफवांचा बाजार उठवणाऱ्या पाकिस्तानचा भारतीय सैन्याकडून पुराव्यांसह पर्दाफाश !

भारत आणि पाकिस्तानमधील (Fact Check ) तणाव वाढत आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा शुक्रवार-शनिवारी रात्री जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागात ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिलं. फिरोजपूरमध्ये भारतीय सैन्याने काही पाकिस्तानी ड्रोन पाडले. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालय आणि सैन्य दलाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी यांनी अफवांचा बाजार उठवणाऱ्या पाकिस्तानचा पुराव्यांसह पर्दाफाश केला आहे. (Fact Check )

दारूगोळा केंद्र नष्ट झाल्याच्या अफवा
कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, पाकिस्तान सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करत आहे. पाकिस्तान खोट्या बातम्या पसरवत आहे. आदमपूर एस 400 सिस्टीम, सुरतगड आणि सिरसा विमानतळ, नगरोटा ब्राह्मोस तळ, चंदीगड दारूगोळा केंद्र नष्ट झाल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या आहेत. पाकिस्तानचा दावा पूर्णपणे खोटा आणि बनावट प्रचार सुरू आहे. (Fact Check )

S-400 बद्दल पाकिस्तानी टीव्हीवर खोट्या बातम्या
S-400 बद्दल बोलताना कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, पाकिस्तानच्या साध्या रॉकेटपासून ते बॅलेस्टिक मिसाइलपर्यंत सर्व हल्ले S-400 ने यशस्वीरित्या परतवून लावले आहेत. त्यामुळे बदल्याच्या आगीत होरपळणाऱ्या पाकिस्तानला काय करावं, ते समजत नाहीय. S-400 मिसाइल डिफेन्स सिस्टिममुळे पाकिस्तानची डोकेदुखी वाढली आहे. या मिसाइल सिस्टिमचा सामना कसा करायचा तेच पाकिस्तानला समजत नाहीय. काल पाकिस्तानने त्यांचं घातक फतेह-1 बॅलेस्टिक मिसाइल भारताच्या दिशेने डागलं. पण भारताने हवेतच पाकिस्तानी मिसाइल नष्ट केलं. चवातळलेला पाकिस्तान मागच्या तीन दिवसांपासून हल्ल्याचा प्रयत्न करतोय. पण भारताची मजबूत मिसाइल डिफेन्स सिस्टिम त्यांचा एक प्रयत्न यशस्वी होऊ देत नाहीय. आता पाकिस्तानी मीडियामध्ये भारताची S-400 मिसाइल सिस्टिम नष्ट केल्याची चर्चा सुरु आहे. आदमपूर येथे असलेली S-400 मिसाइल सिस्टिम नष्ट केल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. पण पाकिस्तानकडून ही अफवा पसरवण्यात येत असून हा दावा खोटा आहे. S-400 मिसाइल सिस्टिम उद्धवस्त केल्याच वृत्त पाकिस्तानी PTV ने दिलं होतं. पण ही बातमी चुकीची आणि अफवा पसरवणारी आहे. (Fact Check )

ब्रह्मोस क्षेपणास्त्राबद्दल अफवा
विंग कमांडर व्योमिका सिंह म्हणाल्या की, पश्चिम सीमेवर तणावाची परिस्थिती कायम आहे. लोइटरिंग अम्युनेशन ड्रोनचा वापर करण्यात आला आहे. तसेच अनेक उच्च दर्जाच्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला आहे. त्यांनी केलेले बहुतेक हल्ले पंजाबला लक्ष्य करून करण्यात आले. पाकिस्तानने नागरी ठिकाणांनाही लक्ष्य केले. याशिवाय पाकिस्तानने चुकीची माहिती पसरवण्याची मोहीम सुरू केली. त्यांच्याकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्राबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. (Fact Check )

भारतीय वैमानिकाला पीओकेमध्ये विमानातून उतरवलं – FactCheck
व्हायरल व्हिडीओमध्ये भारतीय पायलटला पाकव्याप्त काश्मीरमध्ये विमानातून उतरवण्यात आल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडीओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, PIB ने ट्विट करत या दाव्यात काहीही तथ्य नसल्याचे सांगितले आहे. (Fact Check )

बनावट व्हिडिओमागील सत्य काय आहे?
हा व्हिडिओ आझाद काश्मीरच्या कोटली जिल्ह्यातील आहे. सोशल मीडियावर असे अनेक खोटे दावे केले जात आहेत. वाढत्या तणावाच्या काळात, तुम्ही चुकीच्या माहितीला बळी पडू नये. व्हायरल व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी त्यांची सत्यता नेहमी पडताळून पहा. (Fact Check )

हिमालयात भारतीय वायुसेनेचे ३ विमान कोसळले – FactCheck

दरम्यान, हिमालयात भारतीय वायुसेनेचे ३ विमान कोसळले असल्याचे वृत्त सोशल मिडीयावर व्हायरल होत असताना, PIB ने ट्विट करत हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले आहे. पाकिस्तान समर्थक अनेक सोशल मीडिया अकाउंट्स हिमालयीन प्रदेशातील वेगवेगळ्या भागात तीन लढाऊ विमाने कोसळल्याचा खोटा दावा करत आहेत. प्रसारित होत असलेला फोटो जुना आहे, २०१६ चा आहे. (Fact Check )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.