
जैसलमेरनंतर पाकिस्तानने (India Pakistan War ) बाडमेरमध्येही ड्रोन हल्ला केला आहे. जैसलमेरमधील पोकरणमध्ये पाकिस्तानने अर्ध्या तासात दोन ड्रोन हल्ले केले. बाडमेरमध्येही ड्रोन हल्ला झाला आहे. भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हवेतच ड्रोन हाणून पाडले. यापूर्वी, ७-८ मे च्या मध्यंतरी रात्री आणि ८ मे च्या रात्री, पाकिस्तानने राजस्थानमधील पाच लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला होता, जे हवेतल्या हवेत हाणून पाडण्यात आले. (India Pakistan War )
ड्रोन हल्ल्यानंतर बाडमेरमध्ये रेड अलर्ट आणि श्रीगंगानगरमध्ये ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. जैसलमेर, बाडमेर, श्रीगंगानगर, फलोदी तसेच जोधपूर या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आला होता. दुसरीकडे, श्रीगंगानगर, बाडमेर, जैसलमेर आणि बिकानेर जिल्ह्यांसाठी जाहीर झालेल्या पंचायती राज संस्थांच्या पोटनिवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. (India Pakistan War )
हेही वाचा- BMC : वर्सोव्यात अनधिकृत पाच बहुमजली इमारतींवर कारवाई, आणखी ३५ बांधकामे हटवणार
बाडमेर येथे उत्तरलाई एअरबेस आणि जालियापा मिलिटरी स्टेशन असल्याने या ठिकाणी हल्ले करण्यात आले. सीमावर्ती भागात ड्रोन हल्ल्याची शक्यता लक्षात घेता, जैसलमेरचे जिल्हाधिकारी प्रताप सिंह यांच्या सूचनेनुसार बाजार बंद करण्यात आला आहे. प्रशासन वारंवार लोकांना अनावश्यक घराबाहेर पडू नका असे आवाहन करत आहे. (India Pakistan War )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community