Rahul Gandhi यांचा जामीन रद्द करा ; सात्यकी सावरकरांच्या वकिलांची न्यायालयात मागणी

Rahul Gandhi यांचा जामीन रद्द करा ; सात्यकी सावरकरांच्या वकिलांची न्यायालयात मागणी

120
Rahul Gandhi यांचा जामीन रद्द करा ; सात्यकी सावरकरांच्या वकिलांची न्यायालयात मागणी
Rahul Gandhi यांचा जामीन रद्द करा ; सात्यकी सावरकरांच्या वकिलांची न्यायालयात मागणी

लंडनमध्ये केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी दाखल खटल्याच्या सुनावणीला काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) वारंवार तारखा मागत असल्याने त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी सात्यकी सावरकरांच्या वकिलांनी शुक्रवारी (दि. 9) न्यायालयात केली. (Rahul Gandhi)

हेही वाचा-India Pakistan War : भारताचा पाकिस्तानला दणका! भारताची लढाऊ विमानं पाकिस्तानमध्ये घुसली, तीन हवाई तळांवर मोठा हल्ला

त्यावर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे वकील २८ मे रोजी म्हणणे मांडणार आहेत. जामिनाच्या अटींचे उल्लंघन होत असल्याने गांधी यांचा मुचलका जप्त करण्यात यावा, तसेच राहुल गांधी (Rahul Gandhi) न्यायालयात हजर राहतील हे सुनिश्चित करावे, असेही न्यायालयात सादर केलेल्या अर्जात नमूद करण्यात आले आहे. (Rahul Gandhi)

हेही वाचा- India Pakistan War : पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न ; भारतीय लष्कराला हरियाणामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश

राहुल गांधी (Rahul Gandhi) आपली याचिका नोंदविण्यास (प्ली रेकॉर्डिंग) जाणूनबुजून टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे खटल्याच्या सुनावणीत अडथळा निर्माण होत आहे. खटल्याच्या सुनावणीला स्थगिती मागणार नाही, तसेच प्रत्येक तारखेला वकील हजर राहतील, या अटींवर न्यायालयाने राहुल गांधींना जामीन मंजूर केला होता. मात्र, या अटींचे उल्लंघन होत असल्याने, गांधी यांचा जामीन रद्द करून मुचलका जप्त करण्यात यावा, तसेच राहुल गांधी न्यायालयात हजर राहतील हे निश्चित करावे, असा अर्ज सात्यकी सावरकर यांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनी न्यायालयात केला आहे. (Rahul Gandhi)

हेही वाचा- Pakistan : गरज पडली तर मदरशांतील विद्यार्थ्यांना सीमेवर पाठवू; पाकच्या संरक्षण मंत्र्यांचे धक्कादायक विधान

यावर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे वकील मिलिंद पवार पुढील तारखेला म्हणणे मांडणार आहेत. राहुल गांधी यांच्या वकिलांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित ‘माझी जन्मठेप’ व ‘हिंदुत्व’ या पुस्तकांचे इंग्रजी व मराठी भाषांतर, राहुल गांधी यांचे वादग्रस्त भाषण असलेला पेन ड्राइव्ह न्यायालयात मागितला होता. सात्यकी सावरकर यांच्या वकिलांनी हे साहित्य राहुल गांधी यांच्या वकिलांकडे न्यायालयात सुपूर्त केले.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.