India Pakistan War : पाकिस्तानच्या गोळीबारात आयुक्त राजकुमार थापांचा मृत्यू ; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची माहिती

India Pakistan War : पाकिस्तानच्या गोळीबारात आयुक्त राजकुमार थापांचा मृत्यू ; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची माहिती

164

भारत आणि पाकिस्तानच्या (India Pakistan War) तणावादरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये अति. जिल्हा विकास आयुक्त राज कुमार थापांचा मृत्यु झाला आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज कुमार थापा हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत देखील सहभागी झाले होते. (India Pakistan War)

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला ट्विट करत म्हणाले की, “राजौरीहून आलेली ही धक्कादायक बातमी आहे. आपण जम्मू-काश्मीर प्रशासन सेवेतील एक समर्पित अधिकारी गमावला आहे. कालच ते उपमुख्यमंत्र्यांसोबत जिल्ह्यात फिरत होते आणि माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाइन बैठकीला उपस्थित होते. आज पाकिस्तानने राजौरी शहराला लक्ष्य करत केलेल्या गोळीबारात अधिकाऱ्याच्या निवासस्थानावर हल्ला झाला, ज्यामध्ये आमचे अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थप्पा यांचा मृत्यू झाला. या भयानक जीवितहानीबद्दल मला धक्का आणि दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.” असं ओमर अब्दुल्ला म्हणाले. (India Pakistan War)

हेही वाचा-India Pakistan War : पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न ; भारतीय लष्कराला हरियाणामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश

राजकुमार थापा हे जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त (ADDC) म्हणून कार्यरत होते. राजकुमार थापा यांनी जिल्ह्यातील विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. दुर्दैवाने, 10 मे 2025 रोजी, राजौरी जिल्ह्यातील त्यांच्या अधिकृत निवासस्थानावर पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात एक तोफगोळा लागल्यामुळे राजकुमार थापा यांचा मृत्यू झाला. या घटनेत त्यांचे दोन कर्मचारीही गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. (India Pakistan War)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.