पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानवर कठोर कारवाई केली. या कारवाईनंतर पाकिस्तानच्या (Pakistan) नेत्यांमध्ये भीती स्पष्टपणे दिसून येत आहे. यामुळे पाकिस्तानातील नेतेमंडळी सैरभैर जाले आहेत, ते चित्रविचित्र विधाने करत आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तर संसदेत बोलताना, गरज पडली तर पाकिस्तान मदरशांमधील विद्यार्थ्यांचा 100 टक्के वापर करेल, असे विधान केले आहे.
ख्वाजा असिफ यांच्या या वक्तव्याने पाकिस्तानची (Pakistan) पुन्हा एकदा नाच्चकी झाली. मदरशातील विद्यार्थी आपली दुसरी संरक्षण रांग आहे, यात शंका नाही. गरज पडली तर या मदराशातील विद्यार्थ्यांचा 100 टक्के वापर केला जाऊ शकतो, असे वक्तव्य आसिफ यांनी केले आहे.
युद्ध निश्चित असल्याची दर्पोक्ती
प्रकरण शांत होण्याची आशा कमी आहे. गेल्या ३-४ दिवसांत भारताने अनेक वेळा आक्रमक भूमिका दाखवली आहे. आम्ही परिस्थिती कशीतरी शांत करण्याचा प्रयत्न करत राहिलो, पण आता याची आशा फारच कमी आहे. आता आम्ही जशास तसे उत्तर देऊ. युद्ध निश्चित आहे, अशी दर्पोक्ती संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केली. लष्कर निर्णय घेईल. सध्याच्या परिस्थितीत भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्याकडे कोणते पर्याय आहेत याबाबत सैन्य ठरवेल. पण आता हे स्पष्ट झाले आहे की तणाव कमी करण्यासाठी आम्ही केलेले प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. युद्धाने आपले दार ठोठावले आहे याबद्दल कोणालाही शंका नसावी. पाकिस्तानचे (Pakistan) सैन्य भारताशी सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेवर धैर्याने लढत आहे, असेही ख्वाजा असिफ म्हणाले.
दरम्यान भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या प्रत्युत्तर कारवाईनंतर पाकिस्तानी सैन्याचे बरेच नुकसान झाले आहे. लाहोरमध्ये पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली देखील नष्ट झाली आहे. भारताच्या कारवाईची भीती संसदेतही दिसून आली. पाकिस्तानातील (Pakistan) अनेक नेत्यांनी युद्ध करू नका, अशी सरकाराल विनंती केली. एक खासदार तर चक्क संसदेत रडला. आणखी एका खासदाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात तो म्हणतो, युद्ध सुरू झाले तर मी देश सोडून लंडनला पळून जाईन. यावरुनच तेथील नेत्यांमध्येही भारताची भीती स्पष्टपणे दिसत आहे.
Join Our WhatsApp Community