India-Pakistan War : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने सैन्य दलाला महत्त्वाचे अधिकार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयाद्वारे सैन्यदलाच्या प्रमुखांना संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या गॅझेट अधिसूचनेतून पुढील ०३ वर्षांपर्यंत विशेष अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. या अधिकारांतर्गत टेरिटोरियल आर्मीच्या सर्वच अधिकारी आणि सैनिकांना आवश्यक सुरक्षा ड्यूटी नियमित सेनाच्या आधारकरिता सक्रिय सेवेत(एंबॉडीमेंट) बोलवू शकतात. यासंदर्भात दि. ०६ मे रोजी अधिसूचना काढण्यात आली व दि ०८ मेला गॅझेट करण्यात आले.
(हेही वाचा India Pak War: पाकिस्तानच्या छुप्या हल्ल्याला भारताने दिले चोख प्रत्युत्तर, ४८ तासांत ६०० ड्रोन हल्ले परतवले )
दरम्यान, संरक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या गॅझेटच्या माध्यमातून टेरिटोरियल आर्मी नियम १९४८ च्या नियम ३३ नुसार लष्कर प्रमुखांना ०३ वर्षांकरिता अधिकार देण्यात आले आहेत. सद्यस्थितीस ३२ टेरिटोरियल आर्मी इन्फँट्री बटालियनमधील १४ बटालियन देशाच्या विविध सैन्य दलांना, साउदर्न कमांड, ईस्टर्न कमांड, वेस्टर्न कमांड, सेंट्रल कमांड, नॉर्दर्न कमांड, साउथ-वेस्टर्न कमांड, अंदमान व निकोबार कमांड आणि आर्मी ट्रेनिंग कमांड (ARTRAC) येथे तैनात करण्यात येईल.
प्रादेशिक सैन्य नियम १९४८ च्या नियम ३३ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, केंद्र सरकार लष्कर प्रमुखांना त्या नियमांतर्गत अधिकारांचा वापर करण्याचा अधिकार देते की ते प्रादेशिक सैन्यातील प्रत्येक अधिकारी आणि प्रत्येक नोंदणीकृत व्यक्तीला आवश्यक रक्षक प्रदान करण्यासाठी किंवा नियमित सैन्याला आधार देण्यासाठी किंवा पूरक म्हणून नियुक्त करण्यासाठी बोलावू शकतात. हा निर्णय १० फेब्रुवारी २०२५ ते ०९ फेब्रुवारी २०२८ पर्यंत तीन वर्षांसाठी लागू राहील.India-Pakistan War
Join Our WhatsApp Community