India-Pakistan War : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची उच्चस्तरीय आढावा बैठक, केंद्रीय मंत्री म्हणाले…

India-Pakistan War : केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेच्या सज्जतेबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली.

63

India-Pakistan War : केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेच्या सज्जतेबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. देशभरातील आरोग्य व्यवस्था आणि संसाधने सक्षम करण्यासाठी योजलेल्या तातडीच्या आणि व्यापक उपाययोजनांची माहिती याबैठकीत देण्यात आली. दरम्यान, आपत्कालीन प्रकरणे हाताळण्यासाठी वैद्यकीय तयारीची सद्यस्थिती केंद्रीय आरोग्यमंत्री नड्डा यांना सादर करण्यात आली.

(हेही वाचा सिंधू पाणी करारावर पाकिस्तानला धक्का, World Bank ने म्हटले, आम्ही भारताला… )

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सर्व वैद्यकीय आपत्कालीन प्रतिसाद आरोग्य यंत्रणा नेहमीच पुरेशा प्रमाणात सुसज्ज आणि कार्यरत असल्याची खात्री करण्याचे निर्देश दिले. आवश्यक असल्यास, तात्काळ आपत्कालीन आरोग्यसेवा सुनिश्चित करण्यासाठी सर्व राज्य सरकारांशी, प्रामुख्याने जिल्हा पातळीवर, विशेषतः सीमावर्ती राज्यांशी, तळापर्यंत संपर्क प्रभावीपणे स्थापित करण्याचे निर्देशही यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी दिले.

आरोग्य केंद्राने चालू असलेल्या प्रयत्नांवर लक्ष ठेवावे आणि सद्यस्थितीस राज्यांना सहाय्य करावे, असे निर्देशही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. यासोबतच रुग्णवाहिका तैनात करण्याबाबतची कार्यवाही; उपकरणे, औषधे, रक्ताच्या बाटल्या आणि संबंधित वस्तूंचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करणे; बेड, आयसीयू आणि एचडीयूबाबत रुग्णालयांची सज्जता; भीष्म क्यूब्स, प्रगत फिरती ट्रॉमा केअर युनिट्स इ. तैनातीची याबद्दलची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना देण्यात आली.India-Pakistan War

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.