आगामी काळात एसटी महामंडळाच्या ताफ्यात पर्यावरणपूरक Hybrid Fuel वर चालणाऱ्या नव्या बसेस; २५ हजार बस खरेदीचा आराखडा

42
आगामी काळात एसटी महामंडळाच्या ताफ्यात पर्यावरणपूरक Hybrid Fuel वर चालणाऱ्या नव्या बसेस; २५ हजार बस खरेदीचा आराखडा
आगामी काळात एसटी महामंडळाच्या ताफ्यात पर्यावरणपूरक Hybrid Fuel वर चालणाऱ्या नव्या बसेस; २५ हजार बस खरेदीचा आराखडा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (ST) ताफ्यात लवकरच पर्यावरणपूरक आणि इंधन खर्चात बचत करणाऱ्या हायब्रीड इंधनावर (Hybrid Fuel) चालणाऱ्या बसगाड्यांचा समावेश होणार आहे. परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे.

सरनाईक यांनी स्पष्ट केले की, पुढील पाच वर्षांत एसटी महामंडळ दरवर्षी ५,००० या प्रमाणे एकूण २५,००० नव्या बसेस खरेदी करणार आहे. त्यातील पहिल्या ५,००० बसेस चालू आर्थिक वर्षात घेतल्या जातील, तर २०२५-२६ पासून उर्वरित २०,००० बसेस डिझेलसह CNG व LNG या पर्यायी इंधनांवर चालणाऱ्या हायब्रीड प्रकारात असतील. डिझेलचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थितीतच केला जाईल, जेणेकरून प्रवाशांना कोणतीही गैरसोय होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – IMF Aid to Pakistan : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पाकिस्तानला मदत करणार का? शुक्रवारी होईल फैसला)

सध्या एसटीच्या बहुतांश बसेस डिझेलवर चालतात आणि महामंडळाच्या एकूण खर्चापैकी तब्बल ३४% खर्च हा इंधनावर होतो. दररोज १०.७ लाख लिटर डिझेल लागते, तर वार्षिक खर्च सुमारे ३४,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचतो. यामुळे पर्यायी इंधनाचा पर्याय अधिक प्रभावी ठरत आहे. LNG व CNG हे इंधन प्रकार डिझेलपेक्षा स्वस्त असून अधिक कार्यक्षम व पर्यावरणपूरक आहेत. LNG वर बस प्रतिलीटर ५–५.५ किमी तर डिझेलवर केवळ ४ किमी अंतर पार करते.

महामंडळाने किंग्ज गॅस प्रायव्हेट लिमिटेड (Kings Gas Private Limited) या कंपनीसोबत केलेल्या करारानुसार, LNG हे डिझेलपेक्षा २०% स्वस्त दरात मिळणार आहे, ज्यामुळे दरवर्षी सुमारे २३५ कोटी रुपयांची बचत होणार आहे.

राज्यभरात ९० LNG पंप आणि महानगर गॅस प्रायव्हेट लिमिटेड मार्फत २० CNG पंप उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे इंधनाचा पुरवठा सुनिश्चित होईल. या अनुषंगाने, हायब्रीड तंत्रज्ञानावर आधारित बसगाड्यांचे प्रस्ताव विविध बस (Bus) उत्पादक कंपन्यांकडून मागवले गेले असून लवकरच त्या एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

पर्यावरणपूरक भविष्यासाठी एसटी महामंडळाने उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी व्यक्त केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.