India Pak War: पाकिस्तानच्या छुप्या हल्ल्याला भारताने दिले चोख प्रत्युत्तर, ४८ तासांत ६०० ड्रोन हल्ले परतवले

49

India Pak War : प्रथम पहलगाम दहशतवादी हल्ला आणि आता पाकिस्तानने भारताच्या उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील राज्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न केला यावर भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ८ मे रोजी रात्री भारताने अनेक शहरांमध्ये ३६ हून अधिक ठिकाणी किमान ६०० ड्रोन उडवले, तर पाकिस्तानने एकाच वेळी अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. या सर्व हल्ल्यांना भारताने चोख प्रतिउत्तर दिले असून, भारताने पाकला चांगला दणका दिला आहे. (India Pak War)

(हेही वाचा – IMF Aid to Pakistan : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पाकिस्तानला मदत करणार का? शुक्रवारी होईल फैसला)

जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमधील लष्करी क्षेत्रांना लक्ष्य करणाऱ्या पाकिस्तानी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या हल्ल्यांना ४८ तासांत भारताच्या हवाई संरक्षण प्रणालींनी यशस्वीपणे परतवून लावले. पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्यांच्या प्रयत्नांनंतर, जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि राजस्थान या शहरांमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजू लागले. तसेच या राज्यांची सीमा पाकिस्तानशी जोडलेली आहे. तसेच सीमावर्ती गावे आणि शहरांमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट (Blackout) करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच सूत्रांनी सांगितले की, बहुतेक ड्रोन पाठवण्यामागील पाकिस्तानचा हेतू नागरिकांमध्ये दहशत पसरवणे किंवा भारतीय लष्करी आस्थापनांबद्दल गुप्त माहिती गोळा करणे असा असू शकतो.

(हेही वाचा – पाकड्यांना नामोहरम करणाऱ्या S-400 ची खरेदी काँग्रेसच्या काळात रखडलेली; पर्रीकरांमुळे पाहायला मिळत आहेत ‘हे’ दिवस)

दरम्यान ७ मे रोजी सकाळी, पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारताने यावर भर दिला की ऑपरेशन सिंदूर दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी राबवण्यात आले होते. त्यात पाकिस्तानी लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करण्यात आले नव्हते. तसेच ८ मे रोजी पाकिस्तानने जम्मू आणि पठाणकोटमधील लष्करी स्थळांसह भारतातील अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. याला प्रत्युत्तर देण्यात आले. तसेच भारताच्या हवाई संरक्षण प्रणालींनी हवाई हल्ले रोखले. ड्रोनच्या हल्ल्या व्यतिरिक्त, पाकिस्तानने क्षेपणास्त्रे देखील तैनात केली, वृत्तसंस्था पीटीआयनुसार, एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानने सांबा, आरएस पुरा, सतवारी आणि अर्नियावर आठ क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, परंतु हवाई संरक्षण युनिट्सने त्या सर्व पूर्णपणे हाणून पाडल्या.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.