India-Pakistan War : काश्मीरला तिसराच प्रदेश असल्याची वागणूक, पाठिंब्याऐवजी पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्तींचं रडगाणं सुरू

पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी(पीडीपी) नेत्या व जम्मू व काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी भारत-पाकिस्तान(India-Pakistan War) यांच्यातील तणावावरून धक्कादायक वक्तव्य केले.

48

पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी(पीडीपी) नेत्या व जम्मू व काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी भारत-पाकिस्तान(India-Pakistan War) यांच्यातील तणावावरून धक्कादायक वक्तव्य केले. काश्मीरमधील जनतेवर अन्याय कशासाठी असा सवाल उपस्थित करत काश्मीर तिसराच प्रदेश असल्यासारखी वागणूक देण्यात येत आहे, असं म्हणत रडगाणं सुरू केले. सध्याच्या तणावाच्या परिस्थितीत भारतीय लष्कराच्या पाठीशी सबंध देश उभा असताना दुसरीकडे मेहबूबा मुफ्तींचं रडगाणं सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

(हेही वाचा India Pakistan War : लवकरात लवकर लाहोर सोडा; अमेरिकेच्या नागरिकांना सूचना )

दरम्यान, २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना जीव गमवावा लागला. त्यानंतर काश्मीरात मोठं तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. अशातच मेहबूबा मुफ्तींनी रस्त्यावर उतरवून या घटनेचा निषेधदेखील व्यक्त केला होता. आता त्यांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्या म्हणाल्या, आमच्या नागरिकांचं रक्त कशासाठी वाहिलं जात आहे. आमचे निरपराध काश्मिरी मारले जात आहेत, असे सांगत मेहबूबा मुफ्तींनी संवेदनशील परिस्थितीत आपलं रडगाणं सुरू केलं आहे.

तसेच, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी फोनवरून चर्चा करून प्रश्न मिटवावा. उभय देशांमधील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न व्हावे. दोन्ही देशांच्या आक्रमक कारवायांमध्ये काश्मिरी जनता मारली जात आहे. त्यामुळे हे सगळं थांबलं पाहिजे, असे सांगत नेहमीप्रमाणेच आताही रडगाणं सुरू केले आहे.

भारत-पाकिस्तान संघर्षात जम्मू मधील विमानतळावर हल्ले करण्यात आले. पाकिस्तानकडून वारंवार उल्लंघन करून लष्करी कारवाया केल्या गेल्या. यात सीमेवरील नागरिकांचा जीव गेला. आज जम्मू व काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह यांनी जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केल्याचे पाहायला मिळाले.(India-Pakistan War)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.