भारतीय सुरक्षा दलांनी एका पाकिस्तानी वैमानिकाला जिवंत पकडले आहे. या पायलटला राजस्थानमधील जैसलमेरमध्ये अटक करण्यात आली आहे. त्याची ओळख अद्याप उघड झालेली नाही. तथापि, त्याच्या अटकेला अनेक सूत्रांनी दुजोरा दिला आहे. हा वैमानिक पाकिस्तानी एफ-१६ विमान उडवत होता. (India Pakistan War)
(हेही वाचा – India Pakistan War : तुर्कस्तानची पाकड्यांना मदत; मध्यरात्री पाठवले मालवाहू विमान)
गुरुवार, ७ मे २०२५ च्या रात्री जम्मूसह अनेक ठिकाणी झालेल्या अनेक हल्ल्यानंतर भारताने ही कारवाई सुरू केली. या हल्ल्यात हे पाकिस्तानी विमान पाडण्यात आले. यानंतर काही वेळातच, पायलटला अटक करण्यात आली. विमान कोसळण्यापूर्वीच वैमानिक बाहेर पडला होता. त्याला पोखरण परिसरातून अटक करण्यात आली आहे.
भारतीय लष्कराने पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांच्या तळावर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून हवाई हल्ले केले होते. यामध्ये दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्धवस्त करण्यात आले आहेत. भारतीय लष्कराच्या या कारवाईनंतर गुरुवारी रात्री जम्मूच्या सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अर्निया शहरांवर पाकिस्तानकडून आठ क्षेपणास्त्रे डागण्यात आली, असे संरक्षण सूत्रांनी सांगितले. या सर्व क्षेपणास्त्रांना भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने निकामी केले. (India Pakistan War)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community