India Pakistan War : तुर्कस्तानची पाकड्यांना मदत; मध्यरात्री पाठवले मालवाहू विमान

India Pakistan War : या मालवाहू विमानात तुर्की ड्रोन आणि काही क्षेपणास्त्रे असू शकतात, असे सांगितले जात आहे.

82

२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) अंतर्गत भारताने दहशतवाद पुरस्कृत पाकिस्तानला ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे शेजारील देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक देश भारताच्या पाठीशी असले, तरी तुर्कस्तानने पहिल्यापासूनच आतंकवादाला साथ दिली आहे. भारताच्या प्रत्युत्तराने जर्जर झालेल्या पाकिस्तानला तुर्कस्तानने (Turkey) मदत केली आहे. पहिले युद्धनौका पाठवल्यानंतर आता तुर्कस्तानने पाकला मालवाहू विमान पाठवले आहे. (India Pakistan War)

(हेही वाचा – India Pak War : पाकिस्तानची शकले पडणार; बलुचिस्तानचा एक तृतीयांश भागावर कब्जा, भ्याड पाक सैन्य चौक्या सोडून पळाले)

पाकिस्तानमधील कराची विमानतळावर (Karachi Airport) तुर्कीचे एक मालवाहू विमान उतरले आहे. जम्मूमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर या मालवाहू विमानात तुर्की ड्रोन आणि काही क्षेपणास्त्रे असू शकतात. मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास कराची विमानतळावर एक तुर्की मालवाहू विमान उतरले. हे विमान व्हिएतनामहून उड्डाण करत होते. पाकिस्तान आणि तुर्की दोघेही या विमानाची माहिती गुप्त ठेवत आहेत.

पाकिस्तानने भारताच्या नागरी भागात ड्रोनहल्ले करण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारतानेही प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पहिले पाकच्या हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केल्यानंतर आयएनएस विक्रांतव्दारे कराची बंदरावर हल्ला चढवला आहे. (India Pakistan War)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.