best time to visit darjeeling : दार्जिलिंगला फिरायला जायचं आहे? कधी जायचं? किती दिवस लागतात? असे असंख्य प्रश्न असतील तर या लेखात मिळेल उत्तर

25
best time to visit darjeeling : दार्जिलिंगला फिरायला जायचं आहे? कधी जायचं? किती दिवस लागतात? असे असंख्य प्रश्न असतील तर या लेखात मिळेल उत्तर

हिमालय पर्वताच्या खालच्या भागात दार्जिलिंग नावाचं एक हिलस्टेशन आहे. इथून महाकाय कांचनजंगा पर्वत आणि चहाच्या मळ्यांनी वेढलेल्या टेकड्यांचं दृश्य दिसतं. दार्जिलिंगला भेट देण्याचा सर्वोत्तम वेळ तुम्ही कोणत्या प्रकारची सुट्टी शोधत आहात यावर अवलंबून असतो. (best time to visit darjeeling)

लांब ट्रेक किंवा फुलांच्या झाडाखाली निवांत बसण्यासाठी, पर्वतावर रोपवे मधून फिरायचं असेल तर वसंत ऋतू आणि शरद ऋतू हे दार्जिलिंगला भेट देण्यासाठी दोन उत्तम ऋतू आहेत. ज्यांना थंड हवामान खूप आवडतं त्यांच्यासाठी, कमी गर्दी आणि बर्फाच्छादित पर्वतांची सुंदर दृश्यं अनुभवण्यासाठी हिवाळा हा दार्जिलिंग या हिलस्टेशनला भेट देण्यासाठी एक सुंदर काळ असू शकतो. दार्जिलिंगमध्ये पावसाळ्यात फिरायला जाणं हे आव्हानात्मक असू शकतं. म्हणून दार्जिलिंगला भेट देण्यासाठी आधी एक चांगली योजना आखा. (best time to visit darjeeling)

(हेही वाचा – वित्त आयोगाकडून Maharashtra चे कौतुक; कारण..)

दार्जिलिंगला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ कोणता आहे?

दार्जिलिंगला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ काळ हा मार्च ते मे महिन्यांदरम्यान असतो. या काळात वसंत ऋतूचं आगमन झालेलं असतं. या काळात इथे रोडोडेंड्रॉनची फुलं फुललेली असतात. तसंच धुकं निवळून स्वच्छ निळं आकाश दिसतं. दार्जिलिंग इथून कांचनजंगा पर्वत दिसतो. या पर्वताची उंची ८,५८६ मीटर एवढी आहे. कांचनजंगा हा जगातला तिसऱ्या क्रमांकाचा सर्वांत उंच पर्वत आहे. एप्रिल ते जूनच्या सुरुवातीपर्यंत या ठिकाणी आल्हाददायक तापमान, बहुतेकदा निरभ्र आकाश पाहायला मिळतं. (best time to visit darjeeling)

उन्हाळा हा इथला पर्यटनाचा सर्वात मोठा हंगाम असतो. शाळेच्या सुट्ट्यांमध्ये अनेक कुटुंबे दार्जिलिंगला भेट देण्यासाठी येतात. त्यावेळी इथे गर्दीचे रस्ते आणि हॉटेलचे दर जास्त असतात. या दिवसांत तुम्ही दिवसभर शहरात फिरू शकता. तसंच या प्रदेशातल्या अनेक बौद्ध मठांना भेट देऊ शकता. टायगर हिल्सवरून हिमालयावरचा सूर्योदय पाहू शकता आणि या शहरातल्या नेपाळी आणि तिबेटी रेस्टॉरंट्समधून जेवणाचा आनंद घेऊ शकता. (best time to visit darjeeling)

(हेही वाचा – India-Pakistan War : जम्मूमध्ये पाकिस्तानचा पून्हा-पून्हा हल्ला; पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करत भारताचे जोरदार प्रत्युत्तर)

पावसाळ्यात दार्जिलिंगमध्ये मुसळधार पाऊस पडतो. पावसाळा हा ऋतू जून ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंत असतो. सर्व हिल स्टेशन्सप्रमाणेच इथल्या हवामानाचा अंदाज नीट सांगता येत नाही. इथे मे आणि ऑक्टोबरमध्येही पाऊस पडण्याची शक्यता असते. दार्जिलिंगला भेट देताना छत्री सोबतच बाळगा. या प्रदेशातली राष्ट्रीय उद्यानं १६ जून ते १५ सप्टेंबर पर्यंत बंद असतात. पर्वतांची दृश्यं धुक्यामुळे झाकलेली असतात आणि इथे भूस्खलनामुळे आणि रस्ते बंद होण्याची शक्यता असते. (best time to visit darjeeling)

दार्जिलिंगच्या ट्रिपसाठी किती दिवस पुरेसे आहेत?

दार्जिलिंग ट्रिपसाठी तीन ते चार दिवस पुरेसे असतात. एवढ्या वेळात तुम्हाला दार्जिलिंगची सगळी मुख्य आकर्षणे पाहण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. इथे तुम्ही दार्जिलिंग हिमालयन रेल्वे किंवा “टॉय ट्रेन” चा प्रवास करू शकता. जपानी पीस पॅगोडाला भेट देऊ शकता. तसंच ऑब्झर्व्हेटरी हिलवर चालत जाऊन चौकातली गजबजलेली बाजारपेठ पाहू शकता आणि लॉयड बोटॅनिक गार्डनमध्ये छानपैकी फेरफटकाही मारू शकता. (best time to visit darjeeling)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.