आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाने त्याचे प्रशिक्षण घेतले पाहिजे, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी ठाणे येथे केले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ला आणि सीमावर्ती तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ITI विद्यार्थ्यांसाठी अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आणि कौशल्य विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापनाचे शिबिर सुरू झाले आहे. (Disaster Management Training)
राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिबिराचे उद्घाटन करताना मंत्री लोढा म्हणाले की, बदलत्या संकटांच्या स्वरूपामुळे तरुण पिढीला बचाव आणि व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. या शिबिरात विद्यार्थ्यांना आपत्तीपूर्व तयारी, आपत्तीनंतरचे पुनर्वसन, नागरी सुरक्षा व बचावकार्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जात आहे. (Disaster Management Training)
(हेही वाचा – हे Best झाले; आता प्रवाशांना बसचे Live Location कळणार)
यावेळी मंत्री लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी ITI मध्ये सहा नव्या अभ्यासक्रमांची घोषणाही केली. कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रिक वाहन व्यवस्थापन, इंडस्ट्रियल रोबोटिक्स व थ्री-डी प्रिंटिंग, ड्रोन तंत्रज्ञान, सोलर टेक्निशियन व आपत्ती व्यवस्थापन हे अभ्यासक्रम येत्या वर्षीपासून सुरु होतील. (Disaster Management Training)
शिबिरात सुनील मंत्री आणि प्रवीण दीक्षित (Praveen Dixit) यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य एस.एस. माने यांनी आभार मानले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे निर्णयक्षमता आणि रोजगार संधी वाढणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community