India Pak War : सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ITI विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

39
India Pak War : सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ITI विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
India Pak War : सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ITI विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील हजारो ITI विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्याची अभिनव योजना राबविण्यात येत आहे. ठाण्यातील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत या शिबिराचे उद्घाटन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. (India Pak War)

या उपक्रमात अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आणि कौशल्य विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ऑनलाईन कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – Indo Pak War : लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम भारतीय सैन्याने केली उद्ध्वस्त; पाकच्या कुरापतींना प्रत्युत्तर)

मंत्री लोढा यांनी सांगितले की, “आपत्ती मानव निर्मित असो वा नैसर्गिक, प्रत्येक नागरिकाने आपत्ती व्यवस्थापनाचे आणि बचावाचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. नव्या पिढीला सजग बनवणे हे काळाचे imperative आहे.” यावेळी त्यांनी ITI मध्ये सहा नव्या अभ्यासक्रमांचीही घोषणा केली. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ईव्ही व्यवस्थापन, इंडस्ट्रिअल रोबोटिक्स, थ्रीडी प्रिंटिंग, ड्रोन टेक्नोलॉजी आणि सोलर टेक्निशियन या कोर्सेस आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरु होणार आहेत. (India Pak War)

दोन दिवसीय या शिबिरात अनिरुद्धाज अकॅडमीचे CEO सुनील मंत्री, राज्याचे माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित (Praveen Dixit) यांचे मार्गदर्शन लाभले. नागरी संरक्षण आणि आपत्कालीन परिस्थितीत बचाव यावर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षणही देण्यात आले. (India Pak War)

शिबिरात विद्यार्थिनींनी आपत्कालीन बचाव प्रात्यक्षिके सादर केली. प्रारंभी डॉ. लीना गडकरी (Dr. Leena Gadkari) यांनी आपत्ती व्यवस्थापनाची संकल्पना स्पष्ट केली. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य एस. एस. माने (S. S. Mane) यांनी केले आणि उपस्थितांचे आभार मानले. ही उपक्रम शैक्षणिक आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची पावले मानली जात आहेत. (India Pak War)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.