पाकिस्ताना हा आधीच बरबाद झालेला देश आहे, त्याला काय बरबाद करताय तुम्ही? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारताकडून पाकिस्तानवर करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरवर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले. यावर आता वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राज ठाकरेंना खडेबोल सुनावले आहेत.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, राज ठाकरे सिंदूरचा अर्थ त्यालाच समजतो ज्याच्या घरी विचारामध्ये संस्कृती जिंवत आहे. राज ठाकरे कोण आहेत, त्यांच्या बोलण्याला काय किंमत द्यायची ? असा सवाल करतानाच राज ठाकरेंची मती मारली गेली का? असेही त्यांनी म्हटले आहे. ज्या आई-बहीण-मुलीचे सिंदूर पुसल्या गेले त्या वेदना कळण्यासाठी तुम्हाला हिंदुत्ववादी विचाराचे व्हावे लागतंय असा टोलाही सदावर्ते यांनी लगावला आहे. (Gunaratna Sadavarte)
हेही वाचा- Maharashtra Weather : राज्यातील पुढील दोन दिवस अवकाळीचे ! वादळी-वाऱ्यासह पाऊस कोसळणार
डिफेन्सने जो निर्णय घेतला तो अतिशय योग्य घेतला. आज संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सैन्य दलासोबत आहे. राज ठाकरे जे काही व्यक्त होत गेले त्यात देशप्रेम दिसतंय का? असा सवाल त्यांनी माध्यमांशी बोलताना केला. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, राज ठाकरेंना एक सांगायचे आहे, जर देशप्रेम महत्त्वाचे आहे. ज्या गोष्टी पाकिस्तानचा ब्रोडकास्टिंग मिनिस्टर मध्यरात्री पत्रकार परिषद घेऊन आंतराष्ट्रीय चॅनेलवर येऊन जी भाषा बोलतो तिच भाषा राज ठाकरे बोलत आहे, त्यांची मती मारली गेली आहे का? विदेशात फिरुन आल्यानंतर कोणती पाकिस्तानी खाज आहे, मारले जातील. हा देश संविधानाने चालतो. इस्लामिक राष्ट्र आणि जग निर्माण करण्यासाठीचा हा देश नाही. असं सदावर्ते म्हणाले. (Gunaratna Sadavarte)
हेही वाचा- India Pakistan War : पाकिस्तान घाबरला ! कराची, इस्लामाबाद, लाहोर, रावळपिंडीत रात्रभर Blackout
गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, “जेव्हा देशाचा विचार करायचा असतो तेव्हा सर्वांनी राष्ट्रहितासाठी एकत्र यायला हवे. सरकारला मी विनंती करतो की काही मदरशांमध्ये हत्यार सापडले हे आपण बघितले, त्याच प्रकारचा मदरसा तो हाफिज सईद चालवत होता. आता त्या ट्रेनिंगच्या बाबतीत आता महाराष्ट्रात धर्म म्हणून पाहू नका. आर्टिकल 25 म्हणून त्याच्याकडे पाहू नका देश म्हणून पाहण्यात यावे. आर्टिकल 25 नुसार तुम्हाला तुमच्या धर्मानुसार जगण्याची परवानगी दिली आहे, पण आता देशावर जर काही येत असेल तर राष्ट्रधर्म पहिले असायलला हवा. राज्यातील मदरशांमध्ये आवाज ऐकू ऐतील असे कॅमेरे लावले पाहिजे. तिथे काय चालू आहे मशिदीमध्ये काय सुरू आहे हे आपल्याला समजले पाहिजे.” (Gunaratna Sadavarte)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community