-
ऋजुता लुकतुके
किया मोटर्स या कोरियन कार उत्पादक कंपनीला ३० वर्षांचा इतिहास आहे. या कालावधीत कंपनीने एकापेक्षा सरस एसयुव्ही गाड्या बाजारात आणल्या आहेत. इलेक्ट्रिक गाड्यांनी ही बाजारपेठ काबीज केल्यापासून तर या बाबतीत किया मोटर्सने जोरदार आघाडी उघडली आहे. आता कंपनी कॅरेन्स या आपल्या मल्टी पर्पज व्हेहिकल अर्थात एमपीव्हीचं फेसलिफ्ट मॉडेल म्हणजेच कॅरेन्स क्लाव्हिस बाजारात आणलं आहे. नवीन कॅरेन्सचं पुढील ग्रिल आणि मागील ट्रंकचा लूक बदलण्यात आला आहे. बाकी बाहेरून ही गाडी आधी सारखीच आहे. बाकी गाडीत आतून आणि काही प्रमाणात बाहेरूनही मोठे बदल करण्यात आले आहेत. (Kia Carens 2025)
काही दिवसांपूर्वी गाडीचं टेस्ट ड्राईव्ह सुरू असताना हे बदल लोकांना जाणवले होते. तर अलीकडेच गाडीचं ब्रोशरही लोकांसमोर आलं होतं. त्यातून ही गाडी कशी असेल याची कल्पना आलेली होती. कॅरेन्स श्रेणीतील असली तरी क्लाव्हिसमध्ये आधीच्या तुलनेत बरेच बदल आहेत. दिसायला आता ही गाडी ईव्ही५ सारखी दिसेल. गाडीचे हेडलाईट्स हे थ्री-पॉड पद्धतीचे एलईडी हेडलाईट्स असतील. तर टेललाईटन्स जोडणारी दिवांची एक माळ नवीन क्लाव्हिसला असेल. (Kia Carens 2025)
(हेही वाचा – Palladium Phoenix : या पाच कारणांसाठी मुंबईतील फिनिक्स पॅलेडिअम मॉलला भेट द्यायलाच हवी)
Kia’s next big bombshell: New Carens Clavis MPV incoming — full details leaked!
Read the full story:https://t.co/ZwVBk781zd#KiaCarens #KiaClavis #KiaIndia #SUVlaunch #91Wheels #AutoLeaks pic.twitter.com/ZxVMknjIba
— 91Wheels.com (@91wheels) May 7, 2025
आतूनही गाडीत अनेक बदल करण्यात आले आहेत. गाडीच्या डॅशबोर्डवर आता १२.३ इंचांचा डिजिटल डिस्प्ले आहे. तर गाडीचं स्टिअरिंग व्हील फक्त दोन आस असलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे चालकासाठी असलेल्या डिस्प्ले बरोबरच तितक्याच आकाराचा इन्फोटेनमेंट डिस्प्लेही देण्यात आला आहे. या डिस्प्लेला बोसची ८ स्पीकर असलेली यंत्रणा जोडलेली असणार आहे. या गाडीच्या आसन क्षमतेत दोन पर्याय देण्यात आले आहेत. गाडीत आता ६ किंवा तसा पर्याय निवडल्यास ७ जण प्रवास करू शकतात. (Kia Carens 2025)
८ वेगवेगळ्या रंगांत ही गाडी उपलब्ध असणार आहे. सुरक्षेसाठी गाडीत ६ एअरबॅग असून चालकासाठी दुसऱ्या पिढीतील एडीएएस प्रणाली बसवण्यात आली आहे. शिवाय पार्किंगला मदत करण्यासाठी ३६० अंशांतून फिरू शकेल असा कॅमेरा आणि फ्रंट व रेअर पार्किंग सेन्सरही यात बसवण्यात आले आहेत. या गाडीची स्पर्धा मारुती इर्टिगा, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा, मारुती इन्व्हिक्टो या गाड्यांशी असणार आहे. ११ लाख रुपयांपासून तिची किंमत सुरू होईल. (Kia Carens 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community