ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून भारताने पाकिस्तानला (India Pakistan War) सडेतोड उत्तर दिलं. भारतीय सैन्याने मंगळवारी रात्री पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. या मोहीमेला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले होते. भारतीय वायूदलाच्या या हल्ल्यामुळे पाकिस्तानी लष्कर प्रचंड धास्तावले होते. त्यामुळे पाकिस्तानमधील प्रमुख शहरांमध्ये बुधवारी (7 मे) रात्री ब्लॅकआऊट करण्यात आला होता. (India Pakistan War)
हेही वाचा-CBI Director : प्रवीण सूद यांच्या कार्यकाळात १ वर्षांची मुदतवाढ
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये सुरु असलेली पाकिस्तानी सुपर लीग (PSL) रद्द होण्याची शक्यता आहे. पीएसएल लीगमधील संघांमध्ये अनेक परदेशी खेळाडू आहेत. भारत-पाक यांच्यातील वाढत्या तणावामुळे हे परदेशी खेळाडू धास्तावल्याची माहिती आहे. (India Pakistan War)
पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले. पण दुसरीकडे पाकिस्तानच्या कुरापती काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. जम्मू काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये काल पाकिस्तानकडून बेछूट गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात 15 निष्पाप भारतीयांचा जीव गेला आहे. सुमारे 43 हून अधिक नागरिक जखमी आहेत. जखमींमध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे. (India Pakistan War)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community