भारतीय सेनेच्या शौर्याला शिवसेनेचा सलाम; उद्धव ठाकरे यांची Operation Sindoor वर प्रतिक्रिया

97
भारतीय सेनेच्या शौर्याला शिवसेनेचा सलाम; उद्धव ठाकरे यांची Operation Sindoor वर प्रतिक्रिया
भारतीय सेनेच्या शौर्याला शिवसेनेचा सलाम; उद्धव ठाकरे यांची Operation Sindoor वर प्रतिक्रिया

शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये (Operation Sindoor) भारतीय सैन्याने दाखवलेल्या शौर्याबद्दल गौरवोद्गार काढत त्यांचे कौतुक केले आहे. “पहलगाममध्ये (Pahalgam) २६ मायभगिनींचं कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करून भारतीय सैन्याने (Indian Army) अभिमानास्पद प्रतिघात केला आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले की, “पाकड्यांच्या दहशतवादी तळांवर केलेला भारतीय सेनेचा हल्ला ही शौर्यगाथा आहे. दहशतवाद्यांना त्यांच्या पातळीवर उत्तर देणे गरजेचेच होते. आता केवळ सीमारेषेवरच नव्हे, तर भारतात कार्यरत असलेल्या ‘स्लीपर्स सेल’चाही समूळ नाश होणं अत्यंत आवश्यक आहे.”

(हेही वाचा – पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकाच्या पत्नीची Operation Sindoor वर प्रतिक्रिया; आमच्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा…)

ठाकरे यांनी भारतीय सेनेच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त करत सांगितले, “भारतीय सैन्य (Indian Army) कोणत्याही कठीण परिस्थितीला समर्थपणे सामोरे जाऊ शकते, हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने (Operation Sindoor) सिद्ध केले आहे. त्यांच्या या अतुलनीय पराक्रमाला शिवसेनेचा सलाम!”

विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्या बंधू आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सुरात सूर मिसळल्याचे दिसून आले. राज ठाकरे यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेवले होते, त्याच धर्तीवर उद्धव ठाकरे यांनीही सरकारचे थेट नाव न घेता देशातील दहशतवादी यंत्रणा आणि स्लीपर्स सेलवर घणाघात करत सुरक्षिततेबाबत कठोर धोरणांची गरज अधोरेखित केली आहे.

ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेमुळे देशातील दहशतवादविरोधी धोरणांवर पुन्हा चर्चा रंगण्याची शक्यता असून, विरोधकही आता सरकारकडून अधिक निर्णायक कृतीची अपेक्षा व्यक्त करू लागले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.