राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) हे नेहमीच आपल्या रोखठोक भूमिका घेण्यास ओळखले जातात. मंत्रालयातील आयोजित कार्यक्रमात अजित पवारांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना चिमटा काढला. मंत्रालयातील कार्यक्रमात स्वागतावेळी टॉवेलच्या आकाराची शॉल दिल्याने अजित पवारां(Ajit Pawar)नी उपस्थितांना टोला लगावला. मंत्रालयात “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” दि. ०५ ते ०९ मे दरम्यान मंत्रालयात साजरा करण्यात येणार आहे. टेकवारीच्या कार्यक्रमात अजित पवारां(Ajit Pawar)नी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना उद्देश्यून भाषणात नॅपकिन, मिसळ आणि उद्धाटन कात्रीवरून चिमटा काढला.
दरम्यान, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी, प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी टेक वारीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी, अजित पवारांनी केलेल्या भाषणात जोरदार शाब्दिक फटकेबाजी केली. यावेळी, कर्मचाऱ्यांनाही हसू आवरले नाही. तर, उद्घाटन करण्यासाठी चक्क रोबोटने अजित पवारांना कात्री आणून दिली, त्याचा संदर्भ देत नीट काम करा नाहीतर तुमच्या जागी रोबोट येईल, असा चिमटा उपमुख्यमंत्री पवारां(Ajit Pawar)नी कर्मचाऱ्यांना काढला.
टेक वारी नेमकं आहे तरी काय?
मंत्रालयात दि. ०५ ते ०९ मे दरम्यान प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी, प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक’ साजरा करण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता(एआय), ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा, कार्यशाळा व विचारमंथनाच्या प्रशिक्षण दिले जाणार आहे. ‘टेक वारी’ म्हणजे महाराष्ट्र शासन आयोजित पहिली डिजिटल वारी. ‘टेक वारी’ आधुनिक तंत्रज्ञान व नवीन कल्पनांचा संगम असून आधुनिक तंत्रस्नेही महाराष्ट्र घडविण्याची सुरुवात आहे. या ‘टेक वारी’ मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा इत्यादी तंत्रज्ञानाबाबत सत्रे तसेच तणाव व्यवस्थापन, आरोग्यदायी जीवनशैली, ध्यानधारणा याबाबतच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत.(Ajit Pawar)
Join Our WhatsApp Community